कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका, शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:18 AM2019-02-09T04:18:24+5:302019-02-09T04:18:53+5:30

कोळी बांधवांचे शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्य आहे. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या या समाजाने मुंबईत अनेक स्थित्यंतरे पहिली. शहराच्या विकासात योगदान दिले.

Do not count Koliwada in SRA, Shiv Sena aggressor | कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका, शिवसेना आक्रमक

कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका, शिवसेना आक्रमक

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई  - कोळी बांधवांचे शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्य आहे. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या या समाजाने मुंबईत अनेक स्थित्यंतरे पहिली. शहराच्या विकासात योगदान दिले. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर उपरेपणाची वेळ आली आहे, अशी खंत प्रभाग क्रमांक ७ च्या शिवसेना नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.

मुंबईत एकूण ४१ कोळीवाडे आहेत़ उपनगरातील १५ कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका यासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या ११ फेब्रूवारी रोजी पालिका सभागृहात ६६ ब अन्वये ठरावाची सूचना नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे आणणार आहेत.

केंद्रीय फिशरीज इन्स्टिट्यूटच्या मदतीने मुंबईतील कोळी बांधवांची लोकसंख्या व बोटींच्या आधारावर मुंबई उपनगरात २९ कोळीवाडे असल्याची यादी तयार केली होती. शासनाने नेमलेल्या समितीने उपनगरात १४ कोळीवाडे निश्चित केले तर मत्स्यव्यवसाय खात्याने तयार केलेल्या अहवालात १५ कोळीवाडे वगळण्यात आले. त्यामुळे या वगळलेल्या १५ कोळीवाड्यांची गणना भविष्यात एसआरएमध्ये होण्याची दाट शक्यता
आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत त्यांचा विकास होईल. कोळीवाड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत स्वतंत्र तरतुदीद्वारे केलेल्या लाभांचा तसेच भविष्यात कोळीवाड्यांसाठी तयार करण्यात येणाºया स्वतंत्र विकास नियमावलीचा लाभ त्यांना मिळणार नाही.

भूमिपुत्रांच्या व्यवसायावर येईल गदा

कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये झाल्यास मुंबईतील या भूमीपूत्रांच्या व्यवसायावर मोठी गदा येईल. त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भिती शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. ही बाब अतिशय गंभीर असून मुंबईच्या भूमिपूत्रांना असे वाºयावर सोडणे मुंबई महापालिकेला भूषणावह नाही. वगळलेल्या कोळीवाड्यांचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली़

Web Title: Do not count Koliwada in SRA, Shiv Sena aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई