मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची भरभराट होईल; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 08:11 AM2024-05-05T08:11:09+5:302024-05-05T08:11:17+5:30

दहिसर येथे हिरे उद्योगाचे प्रतिनिधी आणि कामगारांशी संवाद साधताना पीयूष गोयल म्हणाले, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे सदस्य या नात्याने ते मुंबईतील उद्योगाची झपाट्याने प्रगती करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.

Diamond industry in Maharashtra including Mumbai will flourish; Testimony of Union Minister Piyush Goyal | मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची भरभराट होईल; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची ग्वाही

मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची भरभराट होईल; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची आणखी भरभराट होणार असल्याचे उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दहिसर येथील मेळाव्यात सांगितले.

दहिसर येथे हिरे उद्योगाचे प्रतिनिधी आणि कामगारांशी संवाद साधताना पीयूष गोयल म्हणाले, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे सदस्य या नात्याने ते मुंबईतील उद्योगाची झपाट्याने प्रगती करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. हिरे आणि आभूषण क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सर्वोच्च प्राधान्य राहील. कौशल्य विकास करून कारागीर आणि कामगारांसाठी रोजगारनिर्मिती करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर आहे. येत्या काळातही यावर जोर देऊन विकास यात्रेत महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल. मुंबईसह इतर भागात हिरे आणि दागिन्यांच्या उत्पादन आणि व्यवसायांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा वाढत असल्याचे ते म्हणाले.

  उद्योग क्षेत्रातील कामगारांना संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, आयुष्मान भारतने ५० कोटींहून अधिक लोकांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ दिला आहे. 

सध्या कच्च्या घरामध्ये किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांना येत्या पाच वर्षांत ते राहात असलेल्या ठिकाणीच पुनर्विकास करून पुनर्वसन केले जाईल. सर्व सुविधांनी युक्त असे घर प्रत्येकाला मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पोदार इंडस्ट्रीजचे अनिल पोदार आणि उमेश पोदार यांनी पीयूष गोयल यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. आमदार मनीषा चौधरी, माजी नगरसेवक जगदीश ओझा, योगिता पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आयुष्मान भारतने ५० कोटींहून अधिक लोकांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ दिला आहे. आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेत चार कोटी कुटुंबीयांना पक्की घरे देण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षात आणखी तीन कोटी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या कच्च्या घरामध्ये किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांना येत्या पाच वर्षांत ते राहात असलेल्या ठिकाणीच पुनर्विकास करून पुनर्वसन केले जाईल. सर्व सुविधांनी युक्त असे घर प्रत्येकाला मिळेल. 
    - पीयूष गोयल

Web Title: Diamond industry in Maharashtra including Mumbai will flourish; Testimony of Union Minister Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.