येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश

By मनोहर कुंभेजकर | Published: October 27, 2023 10:26 PM2023-10-27T22:26:41+5:302023-10-27T22:28:32+5:30

Mumbai News: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी जवळ येथे भगवान शिव मंदिर असलेली ही ८ व्या शतकातील प्राचीन मंडपेश्वर लेणी आहे.

Development of Mandapeshwar Caves will be done by Archeology department till next November, success to Gopal Shetty's efforts | येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश

येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी जवळ येथे भगवान शिव मंदिर असलेली ही ८ व्या शतकातील प्राचीन मंडपेश्वर लेणी आहे. मंडपेश्वर लेणी (मंडपेश्वर गुहा ) हे शिवाला समर्पित 8 व्या शतकातील एक दगडी मंदिर आहे. ही लेणी येथील पोनसूर पर्वताजवळ असून ती लेणी मुळात बौद्ध विहार होती . 

 बोरिवली पश्चिम येथील मंडपेश्वर गुंफा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील  कान्हेरी गुंफा यांचे संवर्धन, संरक्षण आणि एक चांगले पर्यटन स्थळ बनवण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सातत्याने केंद्रीय पुरातत्व विभाग, संबधित केंद्रीय मंत्री आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून पत्रव्यवहार केला होता. तसेच संसदेत आवाज उठवला होता.

मार्च २०२२ मध्ये लोकसभेत प्राचीन  वर, अधिनियम  377 अन्वये मंडपेश्वर गुंफा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील  कान्हेरी गुंफा यांचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली होती .आणि त्यानंतर उत्तर मुंबईतील प्राचीन मंडपेश्वर लेणी आणि मुंबईतील इतर तीन प्राचीन लेण्यांचा विषय लोकसभा पटलावर ठेवण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली.

मंडपेश्वर लेणीच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.येत्या नोव्हेंबर पर्यंत मंडपेश्वर गुहेचे रुपडे पालटणार असून मंडपेश्वर लेण्यांजवळ पुरातत्व विभागा कडून सुशोभीकरण आणि विविध सार्वजनिक सुविधा पुरविल्या जातील.दि,२६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुरातत्व विभागाने मंडपेश्वर लेण्यांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार कसे करणार याची माहिती आपल्याला पत्राद्वारे दिली अशी माहिती त्यांनी दिली.

मंडपेश्वर लेण्यांजवळ काही सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा पुरविल्या जातील असे या पत्रात नमूद केले आहे.यामध्ये सध्या स्थलांतरित केलेले दगड पुनर्संचयित केले जातील,गुहांना क्रिम्ड वायर बीट-प्रूफ जाळी प्रदान केली जाईल.ध्वज मास्ट स्थापनेभोवती मार्ग तयार करण्यात येईल,.
 चर्चजवळ भिंत बंद प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात येईल.

जमीन समतोल केली जाईल आणि जमिनीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हिरवे गवत दिले जाईल,पदपथावर ग्रील देखील जोडले जाईल. उद्यानाच्या विस्तारामध्ये बेंच आणि डस्टबिन बसवण्यात येतील,उद्यानात आणि आजूबाजूला मार्ग असतील,सांस्कृतिक माहिती फलक आणि मार्ग फलक असतील असे या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Development of Mandapeshwar Caves will be done by Archeology department till next November, success to Gopal Shetty's efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.