दहशतवादी हल्ल्याच्या थरारक अनुभवानंतरही प्रवास असुरक्षितच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:16 AM2018-11-21T04:16:04+5:302018-11-21T04:16:27+5:30

बोरीवली हे मुंबईचे उपनगर आहे. बोरीवली पश्चिम रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक असून जंक्शनही आहे, तर वांद्रे स्थानकही मुंबईकरांच्या मोठ्या प्रमाणावरील वापराचे.

 Despite the thrilling experience of terrorist attacks, the journey is unsafe! | दहशतवादी हल्ल्याच्या थरारक अनुभवानंतरही प्रवास असुरक्षितच!

दहशतवादी हल्ल्याच्या थरारक अनुभवानंतरही प्रवास असुरक्षितच!

मुंबई : बोरीवली हे मुंबईचे उपनगर आहे. बोरीवली पश्चिम रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक असून जंक्शनही आहे, तर वांद्रे स्थानकही मुंबईकरांच्या मोठ्या प्रमाणावरील वापराचे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असलेल्या वांद्रे टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र, बोरीवली आणि चर्चगेट या दोन्ही महत्त्वपूर्ण स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. या दोन स्थानकांसोबतच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या दादर स्थानकही असुरक्षितच आहे. त्यामुळे २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव गाठीशी असूनही प्रवाशांचा प्रवास अद्यापही रामभरोसे आहे.

दादरचे प्रवेशद्वारच असुरक्षित
पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकातील दादर महत्त्वाचे स्थानक आहे. दादर स्थानकात दररोज प्रवाशांची संख्या वाढती असल्यामुळे हे स्थानक अतिशय गजबजलेले आहे. दादरमध्ये अनेक कॉपोरेट, सरकारी कार्यालये, बाजारपेठ असल्यामुळे येथे पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत रहदारी सुरू असते. दादर मध्य रेल्वे स्थानकात एकूण आठ फलाटे आहेत. दादर पूर्वेकडून स्थानकात प्रवेश करण्यासाठी पाच ठिकाणी जागा आहे. यामध्ये एकाच ठिकाणी सात मेटल डिटेक्टर आहेत. मात्र, या सर्व मशिन्स बंद आहेत. त्यामुळे दादरचे प्रवेशद्वारच असुरक्षित आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकात एकूण ७ फलाट आहेत. यामध्ये दादर स्थानक पश्चिमेकडे आत येण्यासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. मात्र, येथे मेटल डिटेक्टर नाहीत.
दादर पश्चिमेकडे फूल आणि भाजी बाजार असल्याने, येथे मोठ्या प्रमाणात माल टाकला जातो. यातून संशयित साहित्याची ने-आण करता येण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली. दादर स्थानकात मदत कार्यासाठी ठेवण्यात आलेल्या बाकावर रेल्वेची कोणतीही व्यक्ती दिसून येत नाही. दादर स्थानकात पश्चिम, मध्य आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या येत असतात. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची संख्या जास्त असूनही, त्या मानाने सुरक्षेची विशेष व्यवस्था नाही.

एवढीच काय ती जमेची बाजू
दरम्यान, दादर स्थानकाच्या पुलावर आणि काही फलाटावर आरपीएफचे जवान आणि पोलीस तैनात करण्यात आल्याने, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एवढीच काय ती जमेची बाजू आहे.

बोरीवली रेल्वे स्थानकावर एकूण १० फलाट आहेत, परंतु येथील बहुतांश फलाटावर मेटल डिटेक्टर नाहीत. फलाट क्रमांक १ वर पश्चिमेकडे जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारांपाशी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही, तसेच फलाट क्रमांक ३ वर बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे असून, फलाटावरही सुरक्षेचा अभाव आहे.
प्रत्येक फलाटावर सुरक्षेच्या दृष्टीने संकटकालीन मदतीसाठी मदत कक्षाचे बाकडे ठेवण्यात आले आहेत, परंतु या मदत कक्षाजवळ रेल्वेचे अधिकारी फिरकत नाहीत. त्याऐवजी प्रवाशीच बसण्यासाठी या मदत कक्षाचा आधार घेतात.
फलाट क्रमांक १० मात्र याला काहीसा अपवाद आहे. येथून लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. येथे सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम व्यवस्था आहे. बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांचे सामान तपासूनच त्यांना रेल्वे परिसरात प्रवेश दिला जातो.

वांद्रे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ
वांद्रे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने फलाटावर मेटल डिटेक्टर नाही, त्यामुळे येथील सुरक्षा वाºयावर आहे. वांद्रे येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शासकीय कार्यालये, न्यायालये आणि खासगी न्यायालये असून, दररोज येथे हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. मात्र, स्थानकावर सुरक्षेचा अभाव असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहे.
वांद्रे टर्मिनस व वांद्रे स्थानकजवळ असून, पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्या येथून धावतात. त्यामुळे हे स्थानक सतत गजबजलेले असते, तरीही येथे असणाºया प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेणारी व्यवस्था व सुरक्षा येथे पाहायला मिळत नाही. येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्याचे पाहायला मिळते.

Web Title:  Despite the thrilling experience of terrorist attacks, the journey is unsafe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई