‘डिलिव्हरी बॉय’लाही घ्यावा लागणार एफडीएकडूून परवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:26 AM2019-03-26T06:26:24+5:302019-03-26T06:26:39+5:30

सध्या खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे आॅनलाइन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे.

 'Delivery Boy' will have to take FD license! | ‘डिलिव्हरी बॉय’लाही घ्यावा लागणार एफडीएकडूून परवाना!

‘डिलिव्हरी बॉय’लाही घ्यावा लागणार एफडीएकडूून परवाना!

Next

मुंबई : सध्या खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे आॅनलाइन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. या कंपन्या नवनव्या आॅफर्स काढत ग्राहकांना आकर्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. त्या तुलनेत खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मात्र अन्नपदार्थ हाताळणे आणि अन्न सुरक्षेबाबतचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि सदोष अन्न पोहोचेल याची खात्री नसते. या गोष्टींचा विचार करीत डिलिव्हरी बॉयला एफडीएकडून (अन्न व औषध सुरक्षा प्रशासन) परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.
परवाना सक्ती करण्यात आल्यामुळे आॅनलाइन फूड विक्री कंपन्यामध्ये काम करणाºया डिलिव्हरी बॉयची प्राथमिक माहिती आणि आरोग्याच्या तपशिलाची नोंद अन्न व औषध प्रशासनाकडे राहणार आहे. आॅनलाइन नोंदणी करताना १०० रुपयांचा अर्ज भरावा लागेल. अर्जात सगळी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागते. परवान्याचा कालावधी वर्षभरासाठी असेल. डिलिव्हरी बॉयने अन्नाची विक्री/ डिलिव्हरी करताना परवाना स्वत:कडे बाळगणे अनिवार्य आहे.

जंतूसंसर्ग होण्याचीही शक्यता!
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी याबाबत सांगितले की, मोबाइल फूड वेंडरमार्फत डिलिव्हरी बॉय अन्न विक्री करत असताना कळत-नकळत अन्नासोबत त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने अन्न व औषध प्रशासनाकडे नाव नोंदणी करणे किंवा परवाना घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील करून घेणे गरजेचे आहे.
फूड कंपन्यांकडे प्राथमिक उपचार उपलब्ध नसतील तर एखाद्या डिलिव्हरी बॉयला आजार उद्भवल्यास तो अन्नातून पसरण्याची भीती असते. म्हणून दोन नियमांचे पालन आॅनलाइन फूड कंपन्यांनी करावे, अशी अपेक्षा आहे. काही आॅनलाइन फूड कंपन्या एफडीएचे नियम पाळताना दिसतात. परंतु काहींकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यांनी लवकरच नाव नोंदणी आणि परवाना घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर एफडीए कारवाईचा बगडा उगारेल.

Web Title:  'Delivery Boy' will have to take FD license!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई