सांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 02:12 PM2018-06-25T14:12:08+5:302018-06-25T14:13:25+5:30

राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

Date of Sangli and Jalgaon municipal corporation elections | सांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले 

सांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले 

Next

मुंबई - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या महानगरपालिकांचे मतदान 1 ऑगस्ट रोजी होणार असून, 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्याबरोबरच वसई-विरार महानगरपालिकेतील रिक्त पदांसाठीही 1 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

- निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 4 जुलै ते  11 जुलैरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत दाखल करता येतील. 

- 12 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. 

-17 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 

- 18 जुलै रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.

-18 जुलै रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित कऱण्यात येईल.

- 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान होईल.
 
- 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.

Web Title: Date of Sangli and Jalgaon municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.