#CstBridgeCollapse: two nurses has died who save the lives of patients | Mumbai CST Bridge Collapse : रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या तीन परिचारिकांवरच काळाचा घाला
Mumbai CST Bridge Collapse : रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या तीन परिचारिकांवरच काळाचा घाला

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)  रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यापैकी रुग्णांची सेवा करणाऱ्या तीन परिचारिकांवर काळाने घाला घातला आहे. अपूर्वा (४०) आणि रंजना (३५), भक्ती शिंदे या  तीन परिचारिका जीटी रूग्णालयात कार्यरत होत्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. 

जीटी रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या अपूर्वा आणि रंजना, भक्ती  जीटी रूग्णालयात सुश्रृषा करणाऱ्या या तिघींनी दुर्घटनेत जीव गमावल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत तीन महिलांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपूर्वा प्रभू (४०), रंजना तांबे (३५), भक्ती शिंदे, झाहीद सिराज खान (३२), तपेंद्र सिंह अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 


Web Title: #CstBridgeCollapse: two nurses has died who save the lives of patients
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.