सीएसएमटी संग्रहालय वाद; संपूर्ण इमारत नाही केवळ तळ आणि पहिला मजल्यावर संग्रहालय, रेल्वे बोर्डाचे एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 02:20 PM2018-02-06T14:20:56+5:302018-02-06T14:21:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जागतिक दर्जाचे रेल्वे संग्रहालय बनवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या ड्रीम प्रकल्पापैकी एक असलेला हा प्रकल्प आहे

Csmt museum dispute; Not only the entire building, but also the bottom and first floor museum, one step behind the railway board | सीएसएमटी संग्रहालय वाद; संपूर्ण इमारत नाही केवळ तळ आणि पहिला मजल्यावर संग्रहालय, रेल्वे बोर्डाचे एक पाऊल मागे

सीएसएमटी संग्रहालय वाद; संपूर्ण इमारत नाही केवळ तळ आणि पहिला मजल्यावर संग्रहालय, रेल्वे बोर्डाचे एक पाऊल मागे

googlenewsNext

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जागतिक दर्जाचे रेल्वे संग्रहालय बनवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या ड्रीम प्रकल्पापैकी एक असलेला हा प्रकल्प आहे. मात्र विविध रेल्वे संघटनांच्या विरोधामुळे रेल्वे बोर्डाने एक पाऊल मागे घेतले आहे. यानुसार जागतिक दर्जाचे संग्रहालय बनवण्यासाठी सीएसएम टी इमारतीतील तळ मजला आणि पहिला मजला विचारात घेण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकासह अन्य अधिकाऱ्यांचा हेरिटेज कार्यालयाचा मान कायम राहील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यामुळे येथे जागतिक दर्जाचे रेल्वे वस्तुसंग्रहालय बनविण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. २७ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री मुंबई दौºयावर होते. एल्फिन्स्टन लष्करी पुलाच्या कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी येथे भेट दिली. सीएसएमटी येथील वस्तुसंग्रहालयाचीदेखील पाहणी गोयल यांनी केली. पाहणी करताना गोयल यांच्यासमवेत कला दिग्दर्शक नितीन देसाई, तर इनटॅकच्या उपाध्यक्षा (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज) तसनीम मेहता इ. उपस्थित होते. या वेळी रेल्वेमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीत जागतिक दर्जाच्या संग्रहालय उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या. 

मध्य रेल्वेचे मुख्यालय दुसºया जागी नेण्याचा निर्णय झाला आहे. पर्यायी मुख्यालय म्हणून रेल्वे अखत्यारीत असलेल्या पी. डीमेलो मार्गावरील पाच मजली इमारतीची जागा निश्चित करण्यात आली आहे, या आशयचा पत्र व्यवहार मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांच्यात झाला होता. 

‘नवीन कार्यालय उभारण्यासाठी मध्य रेल्वेच्या २०१८-१९ आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. मुख्यालय दुसºया जागी नेण्याची प्रक्रिया तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे,’ असा मजकूर या पत्रात लिहिला आहे.
१८७८ ते १८८८ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत उभारण्यात आली होती. सद्य:स्थितीत या इमारतीतील रेल्वे कार्यालयांमध्ये ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत सीएसएमटी येथील इमारतीला स्थान दिले आहे.

Web Title: Csmt museum dispute; Not only the entire building, but also the bottom and first floor museum, one step behind the railway board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.