भायखळा विधानसभा मतदारसंघात मतदारांची गर्दी, उन्हापासून बचावासाठी आडोशाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:57 AM2019-04-29T11:57:55+5:302019-04-29T11:58:37+5:30

भायखळा विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली.

A crowd of voters in the Byculla assembly constituency, the basis for summer | भायखळा विधानसभा मतदारसंघात मतदारांची गर्दी, उन्हापासून बचावासाठी आडोशाचा आधार

भायखळा विधानसभा मतदारसंघात मतदारांची गर्दी, उन्हापासून बचावासाठी आडोशाचा आधार

googlenewsNext

मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला, मतदान केंद्रावरील मोबाईल बंदीच्या कारणावरून काही चाकरमान्यांशी पोलिसांशी शाब्दिक वादही होताना दिसले.

माझगाव येथील सेंटमेरी हायस्कूल येथे ज्येष्ठ मतदारांसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासगी वाहनांची व्यवस्था केली होती. त्यामुळे माझगाव परिसरातील ज्येष्ठ मतदारांना दिलासा मिळाला. या खेरीज, बऱ्याच मतदान केंद्रांवर वैद्यकीय मदत कक्ष दिसून आले. या कक्षात चक्कर, अशक्तपणा, शरीरातील साखर कमी होणे, रक्तदाब या आजारांवरील प्राथमिक औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्याकरिता दोन कर्मचारी संपूर्ण नियुक्त करण्यात आले आहेत.

सेंट इझाबेल हायस्कूल , भारत व्यायाम शाळा या मतदान  केंद्रांवर मतदारांसाठी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. भर उन्हात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी या पाणपोईकडे गर्दी केली. सेंट एन्झा स्कुलच्या मतदान केंद्रानजीक पारसी वसाहत असल्याने येथील नागरिकांनी तेथील ज्येष्ठ मतदारांसाठी सहायकांची व्यवस्था केली आहे. जेणेकरून मतदार यादीतील नाव पडताळणी, उचित केंद्र आणि केंद्रांपर्यंत पोहोचणे या मतदारांना सोयीचे होत आहे.

Web Title: A crowd of voters in the Byculla assembly constituency, the basis for summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.