महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 04:47 AM2018-09-13T04:47:27+5:302018-09-13T04:49:49+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

Convert power connection to 237 Ganeshotsav Mandals at discounted rates from MSEDCL | महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

Next

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ठाणे सर्कलमधून ३८२ मंडळांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २३७ मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवल्याने या मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येईल.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अस्थिर आकार आणि १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असा एकूण ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित आहेत. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ३८ पैसे दर आकारण्यात येतील. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहे.
विभाग दाखल अर्ज मंजुरी
ठाणे-१ ६५ ४५
ठाणे-२ ५१ १८
ठाणे-३ ११ १०
वागळे इस्टेट ५४ ३०
मुलुंड १०९ ८३
भांडुप ९२ ५१
एकूण ३८२ २३७
टोल फ्री क्रमांक १९१२,
१८००१०२३४३५, १८००२३३३४३५

Web Title: Convert power connection to 237 Ganeshotsav Mandals at discounted rates from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.