कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कृषी युनिट उभारणार; केंद्राकडून ३०५ कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:52 AM2024-02-19T10:52:12+5:302024-02-19T10:52:59+5:30

राज्यात कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आणि कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहेत.

common facility centers agriculture unit will set up fund sanctioned by the central government | कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कृषी युनिट उभारणार; केंद्राकडून ३०५ कोटींचा निधी मंजूर

कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कृषी युनिट उभारणार; केंद्राकडून ३०५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ, चर्मकार विकास महामंडळ या मागासवर्गीय समाजासाठी कार्यरत असलेल्या महामंडळांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून राज्यात कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आणि कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहेत.

निधीतून कॉमन फॅसिलिटी सेंटर व कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहेत. महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या माध्यमातून रत्नागिरी, नागपूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत सेंटर उभारण्यात येतील. कॉमन फॅसिलिटी सेंटर्स व कृषी प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या कंपन्या व त्या परिसरातील १०० किलोमीटर क्षेत्रातील मागासवर्गीय समाजाला याचा उपयोग होणार आहेत.

उपक्रमाचा उद्देश रोजगाराच्या संधी देणे :

 ही केंद्रे कृषी प्रक्रिया, कोल्ड स्टोअरेज, पॅकेजिंग आणि बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेज यासारख्या सुविधा पुरवतील. 

 ज्यांचा उद्देश उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवणे आहे. 

 कॉमन फॅसिलिटी सेंटर्सबरोबरच मागासवर्गीय समाजातील युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी, तर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये आहे.

 कौशल्य विकास उपक्रमाचा उद्देश रोजगाराच्या संधी देणे आहे.

Web Title: common facility centers agriculture unit will set up fund sanctioned by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.