आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश

By जयंत होवाळ | Published: April 16, 2024 08:28 PM2024-04-16T20:28:17+5:302024-04-16T20:28:50+5:30

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.

Commissioner visits Kanjoor dumping ground; | आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश

आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश

मुंबई : कांजूरमार्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणीभूमीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच अन्य कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये रोज सुमारे ४५०० दशलक्ष टन नागरी घनकचरा गोळा केला जातो.

या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिअॅक्टर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते. तसेच घनकचऱ्यातून खतनिर्मितीची प्रक्रियासुद्धा केली जाते.आयुक्तांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या आणि डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पालिकेच्यावतीने कोका कोला कंपनी आणि कचरा वेचक संघात भागीदारी केली जाणार सांगण्यात आले.

Web Title: Commissioner visits Kanjoor dumping ground;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.