स्वच्छता सर्वेक्षणात मुंबईची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:50 PM2019-03-06T23:50:45+5:302019-03-06T23:50:52+5:30

आगामी आर्थिक वर्षात स्वच्छतेचा निर्धार करणाऱ्या मुंबई महापालिकेचे केंद्राच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल ठरण्याचे स्वप्न भंग झाले आहे.

Cleanliness survey of Mumbai falls | स्वच्छता सर्वेक्षणात मुंबईची घसरगुंडी

स्वच्छता सर्वेक्षणात मुंबईची घसरगुंडी

googlenewsNext

मुंबई : आगामी आर्थिक वर्षात स्वच्छतेचा निर्धार करणाऱ्या मुंबई महापालिकेचे केंद्राच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल ठरण्याचे स्वप्न भंग झाले आहे. कचऱ्याचा भार कमी करणे, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया अशा मोहिमेबरोबरच जनजागृतीवर गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. तरीही सन २०१८ मध्ये १८ व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईची स्वच्छतेच्या परीक्षेत यंदा पिछेहाट झाली आहे. ‘थ्री स्टार’ रेटिंगची स्वप्न पाहणारे मुंबई चक्क ४९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे.
सन २०१६ मध्ये मुंबई महापालिका २८ व्या क्रमांकावर होती. या स्पर्धेत मुंबईचा क्रमांक सुधारण्यासाठी महापालिकेने २०१७ मध्ये अनेक प्रयोग केले. ह्यमुंबई हागणदारीमुक्तह्ण करण्याचा निर्धारही करण्यात आला. या प्रयत्नांना यश येऊन २०१८ मध्ये स्वच्छता मोहिमेत महापालिका १८ व्या क्रमांकावर आली. जागतिक दर्जाच्या मुंबई शहराला थ्री स्टार रेटिंग मिळावे यासाठी महापालिकेने केंद्राकडे अर्ज पाठविला होता. मात्र मुंबईकरांकडून कचरा उचलण्याचा शुल्क वसूल करण्यात येत नसल्याने मुंबईला थ्री स्टार रेटिंग नाकारण्यात आले.
यावर्षी केंद्राचे स्वच्छता निरीक्षक पूर्वकल्पना न देताच हजर झाल्यामुळेही पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. या स्पर्धेत मागे पडण्याची पालिका अधिकाºयांची भीती अखेर बुधवारी खरी ठरली. केंद्र सरकारने नवी दिल्लीत जाहीर केलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१९’ च्या निकालात महापालिकेची घसरण झाल्याचे उघड झाले आहे. मात्र मरीन ड्राईव्ह येथे गेल्यावर्षी बांधलेले पंचतारांकित वातानुकूलित प्रसाधनगृह सर्वोत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रम ठरले आहे. तर वांद्रे येथील नागरिकांच्या पुढाकाराने उभारलेल्या कचºयापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचेही कौतूक झाले, असे सहाय्यक आयुक्त किरण दिग्गावकर यांनी सांगितले.
मुंबईकरांनी केली निराशा
स्वच्छतेबाबत नागरिकांकडून मिळणाºया प्रतिसादाला सर्वाधिक १२५० गुण असतात. मुंबईकर सकारात्मक वोटिंगमध्ये मागे राहतात. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईकर कमी वोट देतात. महापालिकेने दोन कोटी रुपए खर्च करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तरीही फारसे यश आले नाही. याचा फटका बसून मुंबईचे रँकिंग घसरले अशी नाराजी एका वरिष्ठ अधिकाºयाने व्यक्त केली.
अपयशास कारण की...
थ्री स्टार रेटिंगमध्ये मुंबईला सहभागी करावे, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. मात्र कचरा उचलण्याचे शुल्क आकारणे हा या रेटिंगचा महत्त्वाचा निकष होता.
नागरिकांकडून मिळणाºया सकारात्मक वोटिंगमध्ये १२५० पैकी मुंबईला ८४८ गुण मिळाले. याचा फटका बसला.
मलनिस्सारणाचे शंभर टक्के जाळे, सर्व डंपिंग ग्राऊंड बंद करणे, ८० टक्के कचºयावर प्रक्रिया, ओला व सुका कचरा शंभर टक्के वर्गीकरण आणि दररोज शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया सोसायट्या व आस्थापनांना त्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया करण्यास राजी करणे या निकषांमध्ये महापालिका फेल झाली.

Web Title: Cleanliness survey of Mumbai falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.