राज्यातील थंडी ओसरू लागली, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:04 AM2019-02-04T07:04:09+5:302019-02-04T07:04:30+5:30

गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी ओसरू लागली असून, रविवारी मुंबईचे किमान तापमान १७.८ अंश, तर कमाल तापमान २८.६ अंश नोंदविण्यात आले आहे.

 The chill in the state fell, the temperature in Marathwada, Central Maharashtra increased | राज्यातील थंडी ओसरू लागली, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ

राज्यातील थंडी ओसरू लागली, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी ओसरू लागली असून, रविवारी मुंबईचे किमान तापमान १७.८ अंश, तर कमाल तापमान २८.६ अंश नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, किमान तापमानात दोन अंशांची वाढ झाली आहे, तर कमाल तापमान मात्र २८ अंशांवर स्थिर आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
४ आणि ५ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १९ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शहरांचे किमान तापमान
डहाणू १७.२, पुणे १४.२, जळगाव १५.२, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १४.७, नाशिक १३.२, सांगली १५.५, सातारा १४.८, सोलापूर १७.७, उस्मानाबाद १४.७, औरंगाबाद १५.२, परभणी १५.५, अकोला १७, अमरावती १४.८, बुलडाणा १६.८, चंद्रपूर १४.२, गोंदिया १३.२, नागपूर १२.१, वाशिम १६, वर्धा १४.४, यवतमाळ १५.४

हवा बिघडली
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धूलिकणांचे प्रमाण वाढतच आहे. विकासकामे, रस्त्यांची कामे, इमारतींची कामे आणि वातावरणात उत्सर्जित होणारे वायू; आदी कारणांमुळे मुंबईची हवा पुन्हा एकदा बिघडली आहे.
‘सफर’च्या नोंदीनुसार, रविवारी माझगाव परिसरात धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक नोंदविण्यात आले असून, त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर अंधेरी असून, त्याखालोखाल नवी मुंबई प्रदूषित आहे.
 

Web Title:  The chill in the state fell, the temperature in Marathwada, Central Maharashtra increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.