मध्य रेल्वेवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष उपनगरी लोकल धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:49 AM2018-12-04T05:49:53+5:302018-12-04T05:50:04+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मध्य रेल्वेने १२ विशेष उपनगरी लोकल व १४ विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

On the Central Railway, 12 special suburban local trains will run on the occasion of Mahaparinirvana | मध्य रेल्वेवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष उपनगरी लोकल धावणार

मध्य रेल्वेवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष उपनगरी लोकल धावणार

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मध्य रेल्वेने १२ विशेष उपनगरी लोकल व १४ विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथून ठाणे, कुर्ला, कल्याण या मार्गावर व कुर्ला येथून मानखुर्द, वाशी, पनवेल या मार्गांवर या विशेष उपनगरीय धिम्या लोकल धावतील. ५ डिसेंबरच्या मध्यरात्री या लोकल धावतील.
मध्य रेल्वेच्या गाड्या ५ डिसेंबरच्या मध्यरात्री दादर-ठाणे १.१५ वा., दादर-कल्याण २.२५ वा., दादर-कुर्ला ३.०० वा., कुर्ला-दादर १२.४५ वा., कल्याण-दादर १.०० वा., ठाणे-दादर २.१० वाजता सुटतील. तर, मध्यरात्री हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द २.३० वा., कुर्ला-पनवेल ३.०० वा., कुर्ला-वाशी ४.०० वा., वाशी-कुर्ला १.३० वा., पनवेल-कुर्ला १.४० वा., मानखुर्द-कुर्ला ३.१० या वेळी गाड्या चालवण्यात येतील. याशिवाय, १४ विशेष अनारक्षित गाड्याही असतील. नागपूर येथून सीएसएमटीसाठी गाडी क्रमांक १०२६२ ही ४ डिसेंबरला रात्री ११.५५ ला सुटेल. गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबरला सकाळी ७.५० ला, तर गाडी क्रमांक ०१२६६ ही ५ डिसेंबरला दुपारी ३.५५ ला सुटेल. सीएसएमटी ते सेवाग्राम-अजनी-नागपूरला ६ गाड्या धावतील. ०१२४९ ही सीएसएमटी येथून ६ डिसेंबरला दुपारी ४.०५ वाजता सुटेल. तर ०१२५१ ही सीएसएमटी येथून ६ डिसेंबरला सायंकाळी ६.४० ला सुटेल. ०१२५३ ही ६ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता दादर येथून, तर ०१२५५ ही सीएसएमटी येथून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१२५७ सीएसएमटी येथून ८ डिसेंबरला सायंकाळी ६.४० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१२५९ दादर येथून ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल. अजनी येथून गाडी क्रमांक ०२०४० ही ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१३१५ सोलापूरहूल ५ डिसेंबरला सायंकाळी ५.२० वाजता सुटेल तर, गाडी क्रमांक ०१३१६ सीएसएमटी येथून ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०७०५८ आदिलाबाद येथून ५ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०७५७ दादर येथून ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.५० वाजता सुटेल.

Web Title: On the Central Railway, 12 special suburban local trains will run on the occasion of Mahaparinirvana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल