CBSE Class 12th Results 2018 : निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून विशेष व्यवस्था  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 10:52 PM2018-05-25T22:52:25+5:302018-05-25T22:52:25+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

CBSE Class 12th Results 2018: Special arrangements by Microsoft and Google for viewing results |  CBSE Class 12th Results 2018 : निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून विशेष व्यवस्था  

 CBSE Class 12th Results 2018 : निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून विशेष व्यवस्था  

Next

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच विद्यार्थ्यांना निकाल पाहता यावा यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  मायक्रोसॉफ्टने ‘एसएमएस ऑर्गनायझर फॉर अॅन्ड्रॉइड’ नावाचे खास अॅप या निकालांसाठी तयार केले आहे. या अॅपवर  विद्यार्थ्यांनी आपले शाळा क्रमांक, आसन क्रमांक व जन्मतारीख या डिटेल्ससह रजिस्टर करून ठेवल्यास निकाल मेसेजच्या माध्यमातून मिळणार आहे.  तसेच गुगलवर  'CBSE results' or 'CBSE class 10 results' or 'CBSE class 12 results सर्च करून डिटेल्स अपडेट केल्यास निकाल मिळू शकेल.
सीबीएससीची बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची ४ हजार १३८ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध असेल. निकालानंतर मंडळाकडून दि. ९ जूनपर्यंत सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत दुरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असेल. 

Web Title: CBSE Class 12th Results 2018: Special arrangements by Microsoft and Google for viewing results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.