ट्रायच्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिक उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:56 AM2018-12-29T06:56:07+5:302018-12-29T07:05:45+5:30

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिकांनी शुक्रवारी दुपारी ‘स्टार वाहिनी’च्या कार्यालयावर मोर्चा काढला.

Cable commercial landing on the street against the TRAI rules | ट्रायच्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिक उतरले रस्त्यावर

ट्रायच्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिक उतरले रस्त्यावर

Next

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिकांनी शुक्रवारी दुपारी ‘स्टार वाहिनी’च्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने केबल व्यावसायिक उपस्थित होते. या मोर्चाअंतर्गत केबल व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार अनिल परब, काँग्रेसचे आमदार भाई जगताप व मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर एकाच व्यासपीठावर आले होते. केबल व्यावसायिकांना एकूण महसुलापैकी ४० टक्के हिस्सा देण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा; अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

दुपारी अडीच वाजता या मोर्च्याला वरळी येथील जांबोरी मैदान येथे प्रारंभ झाला व ३ वाजता तो लोअर परळच्या स्टार कार्यालयावर धडकला. केबल आॅपरेटर अ‍ॅन्ड डिस्ट्र्यिुब्युटर असोसिएशनने हा मोर्चा काढला होता. असोसिएशनचे अध्यक्ष अनिल परब म्हणाने की, २९ डिसेंबरची मुदत ट्रायला एक महिना पुढे ढकलावी लागली, हा केबल चालकांच्या एकजुटीचा विजय आहे.
आमदार भाई जगताप म्हणाले, ट्रायच्या निर्णयाद्वारे जिओला मोठे करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक होत आहे. तर, मनसेच्या केबल सेनेचे सल्लागार, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी सशुल्क वाहिन्यांवर जाहिराती दाखवण्यास तीव्र विरोध केला.

वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

या मोर्चामध्ये केबल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने वरळी नाका ते लोअर परळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ‘स्टार’च्या कार्यालयाजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेअर टॅक्सी सेवादेखील काही काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

Web Title: Cable commercial landing on the street against the TRAI rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई