मंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:52 PM2017-11-13T22:52:31+5:302017-11-13T22:53:19+5:30

आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.  

The cabinet expansion, the veteran leader at the Chief Minister's residence | मंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल 

मंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल 

Next

मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.  राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते दाखल झाले आहेत. त्यांच्यात महत्त्वपर्ण बैठक सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, जनतेत वाढत असलेल्या विरोधी वातावरणाचं आव्हान यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
हिवाळी आधिवेशनापुर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी देताना काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. काहींच्या खात्यामध्ये फेरबदल केले जाणार आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले होते.  

माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री विनय कोरे यांचाही मंत्रिमंडळ प्रवेश होण्याची शक्यता आहे.कोकणात भाजपा कमकुवत आहे. राणेंना प्रवेश देऊन कोकणात पक्ष बळकट करण्याची भाजपची रणनीती आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी एक माजी मुख्यमंत्री फोडून भाजप काँग्रेसचे आणखी खच्चीकरण करण्याच्या तयारीत आहे. 

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पात बिल्डरला लाभ देणे आणि मुख्यमंत्र्यांचा खोटा शेरा मारल्याचा आरोप झाल्याने त्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरु झाली आहे. त्यांना मंत्रीपदावरुन हटविण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. त्यांचे मंत्रीपद राहीलेच तर त्यांचे खाते बदलले जावू शकते. मंत्रिमंडळातील काही निष्क्रीय मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. फेरबदलासाठी शिवसेनेतही हालचाली सुरु आहेत. सुभाष देसाई यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळाला तर त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती व्हावी म्हणून शिवसेनेच्या काही प्रमुख आमदारांनी फिल्डींग लावली आहे. शिवसेनेला मिळालेल्या खात्यांपैकी उद्योग हे सर्वात महत्वाचे खाते आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही या खात्यावर डोळा आहे.

बैठकीला कोण कोण नेते उपस्थित?  
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थित आहेत. 

Web Title: The cabinet expansion, the veteran leader at the Chief Minister's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.