सीए इंटरमिजिएट आणि फायनलच्या परीक्षेचा निकाल जाहीर, मधुर जैन सीए अंतिम परीक्षेत देशातून पहिला

By रेश्मा शिवडेकर | Published: January 9, 2024 01:19 PM2024-01-09T13:19:49+5:302024-01-09T13:20:10+5:30

जय देवांग जिमुलीया याने सीए इंटरमिजीएटमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

CA Intermediate and Final Exam Result Declared Madhur Jain tops CA Final Exam in Country | सीए इंटरमिजिएट आणि फायनलच्या परीक्षेचा निकाल जाहीर, मधुर जैन सीए अंतिम परीक्षेत देशातून पहिला

सीए इंटरमिजिएट आणि फायनलच्या परीक्षेचा निकाल जाहीर, मधुर जैन सीए अंतिम परीक्षेत देशातून पहिला

मुंबई : 'भारतीय सनदी लेखापाल संस्थे'चा (आय सी ए आय) सीए इंटरमिजिएट आणि फायनलच्या नोव्हेंबर, २०२३च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मधुर जैन याने सीए अंतिम परीक्षेत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जय देवांग जिमुलीया याने सीए इंटरमिजीएटमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

या सत्रात एकूण ८ हजार ६५० उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले आहेत. आय सी ए आयने सीए इंटरमिजिएट गट एकसाठी २ ते ८ नोव्हेंबर दरम्यान तर गट दोनसाठी १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घेतली होती. तर सीए अंतिम परीक्षा १ ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीए इंटरमिजिएट आणि अंतिम निकाल अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करू शकतील. icai.org आणि icai.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे. 

प्रत्येक विषयात ४० टक्के गुण आणि एकूण परीक्षेत ५० टक्के गुण मिळवलेले उमेदवार अनुक्रमे सीए फायनल, सीए इंटरमिजिएट परीक्षेत पात्र ठरतील, असे आयसीएआयचे धीरज खंडेलवाल यांनी सांगितले.

Web Title: CA Intermediate and Final Exam Result Declared Madhur Jain tops CA Final Exam in Country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.