Vidhan Parishad Election 2022: बहुजन विकास आघाडीची मते कोणाला मिळाली? हितेंद्र ठाकूरांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:57 PM2022-06-20T17:57:38+5:302022-06-20T17:58:40+5:30

Vidhan Parishad Election 2022: काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या आधी प्रथम भाजप नेते विधिमंडळात भेटले, असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

bva hitendra thakur reaction after cast vote for vidhan parishad election 2022 | Vidhan Parishad Election 2022: बहुजन विकास आघाडीची मते कोणाला मिळाली? हितेंद्र ठाकूरांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले... 

Vidhan Parishad Election 2022: बहुजन विकास आघाडीची मते कोणाला मिळाली? हितेंद्र ठाकूरांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले... 

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2022) प्रक्रिया सुरू आहे. सर्वच्या सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रसने भाजपच्या दोन उमेदवारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. यानंतर आता बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

निवडणूक निकाल लागल्यावर कोण विजयी झाले. कोणाला किती मते मिळाली हे स्पष्टच होईल. मला फक्त काँग्रेसचे नेते विधानसभेत भेटले आणि घेऊन गेले नाहीत. तुमचे फुटेज बघा आधी भाजपचे नेते आधी आले आणि त्यानंतर काँग्रेस नेते आले. यानंत राष्ट्रवादी सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत. मी कोणावरही नाराज नाही, सगळे मला भेटले विनंती केली. लोकशाही मध्ये मतदानाचा अधिकार मी बजावला आहे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. 

सर्वांच्या आग्रहामुळे क्षितीज ठाकूर निवडणुकीसाठी आले

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची तीनही मते मिळण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. यावर बोलताना, कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी क्षितीज ठाकूर परदेशात गेले होते. भेटायला आलेल्या नेत्यांनी तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी फारच आग्रह धरला. म्हणून ते आले. विमानतळावरून थेट विधिमंडळात आले आहेत. ते घरीही गेले नाहीत, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

छोट्या पक्षांना आणि अपक्षांना १०० टक्के काम करावे लागते

मोठ्या पक्षांकडे मोठी व्होटबँक असते. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्षांना परिश्रम करून आणि आपल्या कामाच्या जोरावर निवडून यावे लागते. मोठ्या पक्षांचे पाठबळ त्या त्या उमेदवाराच्या मागे असते. त्यांना काही प्रमाणात कमी मेहनत घ्यावी लागते. मात्र, आमच्यासारख्या छोट्या पक्षांनी १०० टक्के मेहनत घ्यावी लागते. कार्यकर्ते आणि जनतेचे समर्थन मिळवूनच निवडणुकीत विजय मिळवावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय आमच्या विरोधातच निवडणूक लढवत असतात. आताही येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते आमचे विरोधक म्हणूनच लढणार आहेत. 
 

Web Title: bva hitendra thakur reaction after cast vote for vidhan parishad election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.