म्हाडात दलालीचे काम, दीड कोटीना गंडवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 04:19 PM2024-02-19T16:19:08+5:302024-02-19T16:25:05+5:30

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घराचे स्वप्न भंगले.

brokerage work in mhada one and a half were stolen from a retired officer in mumbai | म्हाडात दलालीचे काम, दीड कोटीना गंडवले!

म्हाडात दलालीचे काम, दीड कोटीना गंडवले!

मुंबई : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लिव्ह इन पार्टनर भाविक शहा (३८) याच्याविरुद्ध समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सना करमाळी (३६) असे तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सनाच्या बहिणीच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी भाविकविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पोलिस तपास करत आहेत.

 सना जून २०२३ पर्यंत वांद्रे परिसरात आईवडिलांसोबत राहत होती. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ती तणावात होती. तिच्यावर औषधोपचार सुरू होते. २०२० मध्ये जुहू येथील कॉलेजमध्ये फॅशन डिझायनरचा कोर्स करत असताना ती भाविकच्या संपर्कात आली. खेळणी निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या भाविकलाही नैराश्य आणि मधुमेहाचा त्रास होता. सना आणि भाविक यांची मैत्री झाली आणि २०२३ मध्ये त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जून २०२३ मध्ये कुटुंबाविरोधात जाऊन ती भाविकसोबत कांदिवली परिसरात लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहण्यास आली.  ऑक्टोबरमध्ये बहिणीकडे तिने भाविकच्या दारूचे व्यसन आणि शारीरिक अत्याचाराबाबत सांगितले. बहिणीने तिला घरी परतण्याचा सल्ला दिला.

पार्टनरचे अत्याचार :

  २४ जानेवारी रोजी सनाने आत्महत्या करत आयुष्य संपविले. तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी भाविक मैत्रिणींना भेटून घरी आल्यानंतर सना आणि त्यांच्या खटके उडाले होते. 

  सनाने बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेऊन आत्महत्या केली. भाविकने सुरक्षारक्षकाला बोलावून दरवाजा तोडला असता सना बेशुद्धावस्थेत मिळून आली. तिला तत्काळ रुग्णालयात नेले मात्र तिचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  तिने भाविकाला एक संधी देण्याचे ठरवले. काही दिवसांतच सनाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यातून ती बचावली. भाविकांच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे बहिणीला सांगितले.  कुटुंबीयांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भाविकाने सनाचा कुटुंबीयासोबतचा संपर्क तोडला. 

Web Title: brokerage work in mhada one and a half were stolen from a retired officer in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.