नवी मुंबईतल्या चिमुकल्या आराध्याला अखेर मिळालं ब्रेनडेड बाळाचं हृदय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 05:45 PM2017-09-05T17:45:45+5:302017-09-05T17:47:23+5:30

गेल्या दीड वर्षांपासून मृत्यूशी दोन हात करणा-या नवी मुंबईतील चार वर्षांची चिमुकली आराध्याला अखेर हृदय मिळालं आहे.

Brained baby's heart gets the heart of the young girl in Navi Mumbai | नवी मुंबईतल्या चिमुकल्या आराध्याला अखेर मिळालं ब्रेनडेड बाळाचं हृदय

नवी मुंबईतल्या चिमुकल्या आराध्याला अखेर मिळालं ब्रेनडेड बाळाचं हृदय

Next

मुंबई, दि. 5 - गेल्या दीड वर्षांपासून मृत्यूशी दोन हात करणा-या नवी मुंबईतील चार वर्षांची चिमुकली आराध्याला अखेर हृदय मिळालं आहे. तिचं हृदय निकामी झाल्यानं तिला मृत्यूची भीती सतावत होती. अखेर तिला एक हृदयदाता मिळाला आहे. 14 महिन्यांच्या ब्रेनडेड बाळाचं तिला हृदय बसवण्यात आलं आहे.

आराध्याला गरज असलेलं हृदय सूरतच्या एका रुग्णालयात उपलब्ध झालं आहे. आराध्याचे वडील योगेश मुळे हे गेल्या दीड वर्षांपासून आराध्यासाठी हृदयदात्याच्या शोधात होते. आराध्याला हृदय मिळावं, यासाठी सोशल मीडियावर मोहीमही राबवली होती. त्या मोहिमेला यश मिळाल्यानं आराध्याला हृदय मिळालं आहे. सूरतहून हृदय मुंबईत आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवल्यानंतर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आराध्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली.

सूरतच्या एका 14 महिन्यांच्या ब्रेनडेड बाळाच्या अवयवदानानंतर आराध्याला हृदय प्राप्त झालं आहे. या बाळाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अवयवदानाबाबत कुटुंबीयांमध्ये जनजागृती केली. कुटुंबीयांनी सहमती दिल्यानंतर आराध्याला हृदय मिळालं आहे. आराध्याला एप्रिल 2016ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त 10 टक्के काम करत असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता. सध्या देशभरात मानवी अवयवांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लाखो लोकांनी प्राण गमवावे लागत आहेत. आपण अवयवदान केल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते. यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यासाठी ‘सेव्ह आराध्या’ हा ट्रेंडही गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होता. या ट्रेंडला अखेर यश मिळालं आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य दिन, दलित, वंचित, उपेक्षितांसाठी खर्ची केले होते. यावर्षी सोशल मीडियावर डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे.  फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आदी सोशल साइट्सवर याचे जोरदार कॅम्पेन करण्यात येत आहे. यासाठी ‘सेव्ह आराध्या’, ‘ऑर्गन डोनेशन’ ही टॅगलाईन वापरण्यात आली होती. अनेकांनी अवयवदान करण्याचा अर्ज भरून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले होते. 
कोण आहे आराध्या
मुंबईतील आराध्यामुळे या चार वर्षीय मुलीला डायलेटेड कार्डिओमायोपाथी हा दुर्धर प्रकारचा हृदयविकार झाला आहे. तिला वाचविण्यासाठी सध्या एका हृदयाची आवश्यकता आहे. आराध्यासाठी ड+, ड -, अ +, अ - या रक्तगटाचा दाताच ह्रदयदान करू शकतो. यासाठी 10 ते 15 वयोगटातील व्यक्तीची गरज आहे. जिचे वजन 40 किलोपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आराध्याला मदत करण्याचे आवाहन ‘सेव्ह आराध्या’तून करण्यात येत आहे. याचबरोबर अवयवदान ही काळाची गरज असल्यामुळे ते प्रत्येकाने करावे हा सामाजिक संदेशही यातून देण्यात येत आहे.
मी केले तुम्ही करणार का ?
सोशल मीडियावर मी केले तुम्ही करणार का? असा प्रश्नही ट्विटरवर नेटिझन्स अवयवदानावर विचारत आहेत.  यावर अनेकजण कॉमेंट, लाईक, शेअर करून ‘सेव्ह आराध्या’ला पाठिंबा देत आहेत. यातून अवयवदानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.

Web Title: Brained baby's heart gets the heart of the young girl in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.