युतीसाठी भाजपाचा नवा प्रस्ताव, सेनेला लोकसभेच्या एवढ्या जागा देण्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 09:21 PM2019-01-27T21:21:47+5:302019-01-27T21:22:07+5:30

 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेकडून स्वबळाच्या नाऱ्याचा वारंवार पुनरुच्चार केल्यानंतरही भाजपाकडून युतीसाठी प्रयत्न सुरू आहे.

BJP's new proposal for the alliance, ready to give Senna the number of seats available for the Lok Sabha | युतीसाठी भाजपाचा नवा प्रस्ताव, सेनेला लोकसभेच्या एवढ्या जागा देण्याची तयारी 

युतीसाठी भाजपाचा नवा प्रस्ताव, सेनेला लोकसभेच्या एवढ्या जागा देण्याची तयारी 

Next

मुंबई -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेकडून स्वबळाच्या नाऱ्याचा वारंवार पुनरुच्चार केल्यानंतरही भाजपाकडून युतीसाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेकडून युतीसाठी होकार यावा यासाठी भाजपाने नवा प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावानुसार भाजपाने सेनेला दोन जागा वाढवण्याची तयारी दर्शवली आहे.  यानुसार दोन्ही पक्षांसाठी 50:50 टक्के जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरणार आहे.

पुढील निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. पण शिवसेनेचे नेते मात्र वारंवार स्वबळाची भाषा करत असल्याने युतीचे घोडे अडले आहे. अगदी शिवसेना पक्षप्रमुखही स्वबळाचा पुनरुच्चार करत असल्याने युतीबाबत अनिश्चितता आहे. 

Web Title: BJP's new proposal for the alliance, ready to give Senna the number of seats available for the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.