टी-सिरीजचे भूषणकुमार यांना कोर्टाचा दिलासा, बलात्कार, फसवणुकीचे आरोप वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:18 PM2023-12-01T12:18:29+5:302023-12-01T12:18:45+5:30

Bhushan Kumar :

Bhushan Kumar of T-series was dropped from court relief, rape, fraud charges | टी-सिरीजचे भूषणकुमार यांना कोर्टाचा दिलासा, बलात्कार, फसवणुकीचे आरोप वगळले

टी-सिरीजचे भूषणकुमार यांना कोर्टाचा दिलासा, बलात्कार, फसवणुकीचे आरोप वगळले

मुंबई -टी-सिरीजचे मालक भूषणकुमार यांना दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बलात्कार व फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला ‘बी-समरी’ रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला. त्यामुळे भूषणकुमार यांना दोन्ही आरोपांतून वगळण्यात आले आहे. 

अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी सादर करण्यात आलेला ‘बी-समरी’ स्वीकारल्याने भूषणकुमार यांच्यावरील गुन्हा एकप्रकारे रद्द झाला. तक्रारदाराने दुर्भावनापूर्णपणे आरोपीविरोधात तक्रार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यावर किंवा तपासाअंती आरोपीविरोधात कोणतेही पुरावे  न सापडल्यास पोलिस ‘बी-समरी’ रिपोर्ट दाखल करतात. 

 काय आहे प्रकरण? 
 जुलै २०२१मध्ये  डीएननगर पोलिस ठाण्यात भूषणकुमार यांच्याविरोधात बलात्कार व फसवणूकप्रकरणी  तक्रार करण्यात आली.  तक्रारीनुसार, कुमार यांनी त्यांच्या कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केला. २०२२ मध्ये पोलिसांनी याप्रकरणात ‘बी-समरी’ रिपोर्ट दाखल केला. 
 तक्रारदाराचे वर्तन पाहत न्यायालयाने ‘बी-समरी’ रिपोर्ट स्वीकार करण्यास नकार दिला. याआधी कुमार यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात गुरुवारच्या सुनावणीत कुमार यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी न्या. प्रकाश नाईक व एम. आर. बोरकर यांच्या खंडपीठाला माहिती दिली की, ‘बी-समरी’ रिपोर्ट दंडाधिकारींनी स्वीकारला असून, गुन्हा रद्द करण्याची याचिका प्रलंबित ठेवण्यात अर्थ नाही. खंडपीठाने मुंदरगी यांचे म्हणणे मान्य करत याचिका निकाली काढली.

Web Title: Bhushan Kumar of T-series was dropped from court relief, rape, fraud charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.