....अन्यथा भन्साळींना यापुढे एकाही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही - राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 04:12 PM2017-11-15T16:12:26+5:302017-11-15T16:15:08+5:30

राम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोबतच इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही हेदेखील स्पष्ट झालं आहे.

Bhansali will not let a single film shoot anymore if he does not ban Padmavati says Ram Kadam | ....अन्यथा भन्साळींना यापुढे एकाही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही - राम कदम

....अन्यथा भन्साळींना यापुढे एकाही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही - राम कदम

Next
ठळक मुद्देभाजपा आमदार राम कदम यांनीही पद्मावती चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहेराम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहेछेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही असं राम कदम बोलले आहेत'चित्रपटात बदल न केल्यास येथून यापुढे त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होऊ देणार नाही'

मुंबई - पद्मावती चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे वाद वाढू लागल्याचं दिसत आहे. सध्यातरी हा वाद शमण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसून आता भाजपा आमदार राम कदम यांनीही चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. राम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोबतच इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही हेदेखील स्पष्ट झालं आहे.

राम कदम यांनी फिल्म स्टुडिओ अलाइड मजदूर युनियनच्या माध्यमातून याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. राम कदम यांनी दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी चित्रपटात बदल न केल्यास येथून यापुढे त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होऊ देणार नाही अशी धमकीच दिली आहे. 

'आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत. जर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी बंदीची मागणी मान्य केली नाही तर यापुढे आमची संघटना त्यांना कोणत्याही चित्रपटाचं शुटिंग करु देणार नाही', असं राम कदम बोलले आहेत. 



 

1  डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'पद्मावती' चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत कोणीही हा चित्रपट रिलीज होण्यापासून रोखू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. एक महिला म्हणून या चित्रपटाचा भाग असणं, आणि ही कथा लोकांसमोर मांडण्यात मला गर्व वाचत आहे. जो सांगण्याची गरज नाही असं दीपिका पादुकोन बोलली आहे. 
 

Web Title: Bhansali will not let a single film shoot anymore if he does not ban Padmavati says Ram Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.