‘मोमो चॅलेंज’पासून सावध व्हा..., उच्च शिक्षण संस्थाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:44 AM2018-09-10T02:44:00+5:302018-09-10T02:44:13+5:30

ब्लू व्हेल या आॅनलाइन गेमनंतर आता देशभरातील पालकांची आणि शिक्षकांची मोमो गेमने झोप उडवली आहे.

Beware of 'Momo Challenge' ..., Higher Education Institutions | ‘मोमो चॅलेंज’पासून सावध व्हा..., उच्च शिक्षण संस्थाच्या सूचना

‘मोमो चॅलेंज’पासून सावध व्हा..., उच्च शिक्षण संस्थाच्या सूचना

Next

मुंबई : ब्लू व्हेल या आॅनलाइन गेमनंतर आता देशभरातील पालकांची आणि शिक्षकांची मोमो गेमने झोप उडवली आहे. मोमोमुळे पालकांसोबतच शिक्षकही चिंतातुर झाले आहेत. आपली मुले, विद्यार्थी या गेमच्या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे या गेमवर भारतात बंदी घालण्याची मागणी होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता मानव संसाधन विकासाच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या सर्व विभागप्रमुखांना तसेच शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या प्रमुखांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
मोमो चॅलेंज संदर्भात शाळा व महाविद्यालयांनी आवश्यक ती सावधानता बाळगण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना कराव्यात, अशा सूचना मानव संसाधन विभागाने केल्या आहेत. देशभरात सध्या मोमो या आॅनलाइन गेमचे थैमान सुरू असून सोशल नेटवर्किंग साइटवरही याच गेमची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. हे मोमो व्हॉट्सअ‍ॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनीही धास्ती घेतली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या गेमवर भारतात बंदी घालण्याची लेखी मागणी काही शिक्षक संघटनांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून केली होती.
काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेमची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आता मोमो चॅलेंज हा गेम समोर आला आहे. विद्यार्थ्यांना या गेमचे वाढते आकर्षण असल्यामुळे वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या सूचना मानव संसाधन विकास विभागाकडून करण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या संबंधित महाविद्यालयीन प्रमुखांनी आणि शालेय शिक्षणप्रमुखांनी याची दखल घ्यायची आहे.
>आॅनलाइन गेमिंगवर नियंत्रणाची गरज
भारत सरकारने यासाठी आॅनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी नियमन आणणे ही काळाची गरज आहे. या नियमकांनी भारतात येणारा गेम आपल्या संस्कृतीला आणि देशाने ठरविलेल्या मापदंडांची पूर्तता करत आहे ना याची खात्री करून घ्यावी आणि नंतरच तो बाजारात आणावा, असे मत शिक्षक आणि पालकांमधून व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेमची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आता मोमो चॅलेंज हा गेम समोर आला आहे. विद्यार्थ्यांना या गेमचे वाढते आकर्षण असल्यामुळे वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

Web Title: Beware of 'Momo Challenge' ..., Higher Education Institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.