बेस्ट निर्णय ! बसचे किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावास मंजुरी  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:17 PM2019-06-25T16:17:41+5:302019-06-25T16:18:52+5:30

बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर आता महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येईल.

BEST decision! Proposal for the minimum fare of Rs. 5 in mumbai | बेस्ट निर्णय ! बसचे किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावास मंजुरी  

बेस्ट निर्णय ! बसचे किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावास मंजुरी  

Next

मुंबई - बेस्ट उपक्रमाची आर्थिक बाजू सावरण्यासाठी 600 कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सोमवारी अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर, आज महापालिकेच्या बेस्ट समितीने किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे बेस्टचे किमान भाडे पाच रुपये असणार आहे. त्यानुसार, प्रवाशांकडून पहिल्या टप्प्यातील 5 किमी अंतरापर्यंत केवळ 5 रुपये भाडे आकारण्यात येईल. 

बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर आता महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यानंतर, महापालिकेत मंजुरी मिळताच, ही किमान भाडे आकारणी नव्या दराने लागू होणार आहे. महापालिका महासभेची बैठक 27 जून रोजी असून बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव मंजुरीसाठी तेथे येईल. महापालिकेत मंजूर झाल्यानंतर आरटीओकडे आणि त्यानंतर नवीन दर अंमलात येतील, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले. तसेच, बेस्ट प्रवाशांसाठी 530 नवीन बसगाड्यांची ऑर्डर बेस्ट उपक्रमाने दिली आहे. सध्या, बेस्टचा प्रवाशी वर्ग दैनिक 22 लाख एवढा असून ही संख्या 40 लाखांवर नेण्याचे बेस्ट उपक्रमाचे लक्ष्य आहे, असेही बागडे यांनी म्हटले. 

बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्यानंतर पालिका प्रशासनाने 600 कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला. आज अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला. त्यास, महापालिकेने संमती दिली आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपए अनुदान देण्यास स्थायी समितीने नुकताच हिरवा कंदिल दाखविला. त्यानुसार उर्वरित रक्कमेसाठी महापालिका प्रशासनाच्या अटीनुसार बेस्ट उपक्रम किमान बसभाड्यात कपात करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत मंजुरीसाठी बेस्ट प्रशासनाने मांडला आहे. याप्रमाणे बेस्टचे किमान भाडे आठ रूपयांवरून 5 रुपए होणार आहे. याचा फायदा 64 टक्के प्रवाशांना होणार आहे.

पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची तयारी दाखविली. त्यानुसार सहाशे कोटी रुपए अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यापैकी शंभर कोटी रुपएचं पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. तर उर्वरित पाचशे कोटींसाठी आयुक्तांनी बेस्ट प्रशासनापुढे काही अटी ठेवल्या आहेत. कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनामध्ये गेल्या आठवड्यात सामंजस्य करार झाल्याने भाड्याने बस घेण्याचा प्रस्ताव मार्गी लागला.

बेस्टसाठी काही अटी...
भाडे तत्वावर टप्यटप्याने डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिकवर चालणा-या सात हजार बस गाड्यांचा ताफा तयार करावा.
थांब्यावर बसगाड्यांचे आगमन व प्रस्थानाची वेळ असावी. आॅक्टोबर 2019 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी.
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न. तीन महिन्यांत भाड्याने घेतलेल्या बसगाड्यांचा ताफा सात हजारपर्यंत वाढवून त्याबाबत अहवाल सादर करावा.

त्यासाठी भाडेकपात....
बेस्ट बसगाड्यांमधून दररोज 25 लाख प्रवाशी प्रवास करतात. ही संख्या यापूर्वी तब्बल 43 लाख एवढी होती. प्रवासी भाडे कमी केल्यानंतर कमी अंतरावरील प्रवासी संख्या वाढेल, असा पालिकेला विश्वास वाटतो. भाडेकपातीचा फायदा सुमारे 16 लाख प्रवाशांना होईल, असा अंदाज बेस्टमधील सुत्रांनी व्यक्त केला.

बस थांब्यावरील प्रतीक्षा संपणार
बस भाड्याने घेताना 3337 बसचा ताफा आणि कामगारकपात करण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भाडेकरारावरील बसगाड्यांमुळे बेस्टचा ताफा वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांची बस ताफ्यावरील प्रतीक्षा संपणार आहे. 1200 कोटी रुपयांची मागणी - गटनेत्यांच्या बैठकीत दरमहा 100 कोटी प्रमाणे 12 महिन्यांसाठी 1200 कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र आता 600 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 1200 कोटी रुपये दिले असते तर बेस्ट उपक्रमाला सुधारणा आणि आराखडा चांगल्या प्रकारे करता आल्या असत्या, असे मत विरोधी पक्षाने व्यक्त केले. 

Web Title: BEST decision! Proposal for the minimum fare of Rs. 5 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.