भिक्षेकरी म्हणून बेघरांवर कारवाई, पोलिसांविरोधात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 04:53 AM2018-07-10T04:53:34+5:302018-07-10T04:56:18+5:30

पावसाळ्यात भिक्षेकरी म्हणून बेघर लोकांवर होणाऱ्या कारवाईविरोधात बेघर अभियान या सामाजिक संस्थेने तीव्र रोष व्यक्त केला आहे.

 As a beggar, action against the homeless, anger against the police | भिक्षेकरी म्हणून बेघरांवर कारवाई, पोलिसांविरोधात नाराजी

भिक्षेकरी म्हणून बेघरांवर कारवाई, पोलिसांविरोधात नाराजी

Next

मुंबई : पावसाळ्यात भिक्षेकरी म्हणून बेघर लोकांवर होणाऱ्या कारवाईविरोधात बेघर अभियान या सामाजिक संस्थेने तीव्र रोष व्यक्त
केला आहे. कुर्ला सत्र न्यायालयाने तीन बेघरांची सुटका करताना सोमवारी पोलिसांना चांगलाच दम भरल्याचेही संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्या यांनी सांगितले.
आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात १००हून अधिक बेघरांवर भिक्षेकरी म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
निवारा नसल्याने बहुसंख्य बेघर पदपथांवर प्लॅस्टिकचा तात्पुरता निवारा उभारतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्यात बेघरांच्या तात्पुरत्या निवाºयांवर कारवाई करता येत नाही. तरीही पोलिसांकडून या प्लॅस्टिक निवाºयांची मोडतोड केली जाते. ब्रिटिशकालीन कायद्यानुसार भिक्षेकरीस आरोपपत्र दाखल न करता त्यांना न्यायालयात हजर केले जाते. या कायद्याचा पोलिसांकडून दुरुपयोग होत असल्याचा आरोपही आर्या यांनी केला आहे. विशेषत: दक्षिण मुंबईतील बेघरांना हद्दपार करण्यासाठी पोलीस या कायद्याचा वापर करतात, असेही आर्या यांनी सांगितले. मुळात बेघरांसाठी काम करताना संस्थेने आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र अशा विविध कागदपत्रांची उपलब्धता करून दिलेली आहे. याशिवाय बेघरांना स्वावलंबी करण्यासाठी विविध स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यानुसार मोकळ्या जागांमध्ये संबंधित बेघर पिशव्या तयार करणे, फुले विकणे, हार तयार करणे, टोपल्या विणणे असे विविध व्यवसाय करत असतात. मात्र उच्चभ्रू व्यक्तींच्या तक्रारीमुळे पोलिसांकडून त्यांना शहराबाहेर हद्दपार केले जात
असल्याच्या अनेक तक्रारी बेघरांनी केल्याची माहिती संस्थेने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी बेघरांवर आकसापोटी किंवा अन्य कारणाने
कारवाई न करता माणूस म्हणून जगू देण्याचे आवाहन बेघर अभियान संस्थेने केले आहे.
 
उच्चभ्रू व्यक्तींच्या तक्रारीमुळे पोलिसांकडून शहराबाहेर हद्दपार केले जात असल्याच्या अनेक तक्रारी बेघरांनी केल्या आहेत. विशेषत: दक्षिण मुंबईत हे प्रकार जास्त प्रमाणात होतात, अशी माहिती बेघर अभियान संस्थेने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी बेघरांवर आकसापोटी किंवा अन्य कारणाने कारवाई न करता, माणूस म्हणून जगू देण्याचे आवाहन बेघर अभियान संस्थेने केले आहे.
 

Web Title:  As a beggar, action against the homeless, anger against the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.