पायात त्राण नसलेल्यांना ‘मुव्हेबल कॅलिपर्स’चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:24 AM2019-04-14T06:24:10+5:302019-04-14T06:24:20+5:30

गरिबीत जन्मलेल्या अनीश कर्मा याला लहानपणी पोलियो झाला. आर्थिक परिस्थितीमुळे तो शिक्षण पूर्ण करू शकला नाही.

The basis of 'Mlevible Calipers' for those who are not safe in step | पायात त्राण नसलेल्यांना ‘मुव्हेबल कॅलिपर्स’चा आधार

पायात त्राण नसलेल्यांना ‘मुव्हेबल कॅलिपर्स’चा आधार

Next

मुंबई : गरिबीत जन्मलेल्या अनीश कर्मा याला लहानपणी पोलियो झाला. आर्थिक परिस्थितीमुळे तो शिक्षण पूर्ण करू शकला नाही. मात्र, नशिबापुढे झुकणे त्याला मान्य नव्हते. कोणत्याही प्रकारचे व्यंग यशाच्या मार्गात अडथळा येता कामा नये, यासाठी उत्तम प्रकारचे आणि मुव्हेबल कॅलिपर्स तयार करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. आयआयटी बॉम्बे व बेटिकच्या सहकार्याने त्याने हे स्वप्न सत्यात आणले आहे.
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील रहिवासी असलेल्या अनीश कर्माने काफो (नी अँकल फूट आॅर्थोसिस) म्हणजेच कॅलिपर हे उपकरण आयआयटी बॉम्बे-बेटीकच्या वैद्यकीय उपकरणांच्या प्रदर्शनात ठेवले आहे. पाय अशक्त असलेल्यांना या साधनाच्या मदतीने चालताना आधार मिळतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पोलियो, अर्धांगवायू, तसेच अपघात झालेल्या व्यक्तिंना नी अँकल फूट आॅर्थोसिसची आवश्यकता असते. काही संस्था या रुग्णांना मोफत कॅलिपर्स देतात, पण ते आरामदायी नसतात. आयात केलेली उपकरणे चांगल्या दर्जाची असली, तरी बहुतेकांना परवडू शकत नाहीत. अनीशने तयार केलेले कॅलिपर भारतीय बनावटीचे उत्तम कॅलिपर मानले जात आहे.
दरम्यान, भारतीय परिस्थितीला अनुसरून नावीन्यपूर्ण यंत्रणा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण आयआयटी मुंबईतील बेटीकच्या नेटवर्कमध्ये दिसून येते. वैद्यकीय उपकरणांचा योग्य उपयोग करून केलेले संशोधन आणि त्याद्वारे सर्वांसमोर आलेल्या यशोगाथा यामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळते. अनेकांना याचा प्रभावी वापर करता येतो. त्यामुळे ही यंत्रणा अत्यंत परिणामकारक आहे. अशा प्रकारची यंत्रणा अधिक व्यापक स्तरावर केली पाहिजे आणि देशभरात या यंत्रणेचे अनुकरण करणे गरजेचे आहे, असे प्रसिद्ध अणु भौतिकशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी सांगितले.
>एकच व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
बेटिकमध्ये डॉक्टर्स, संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपकरणांचा शोध लावण्यासाठीची यंत्रणा तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे बेटिकचे संस्थापक प्राध्यापक बी. रवी यांनी सांगितले.
हृदयाची धडधडही
ऐकू येणार स्पष्ट
आयआयटी बॉम्बे आणि बेटिकने म्हणजेच बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी (इन्क्युबेशन) सेंटरतर्फे आयोजित या प्रदर्शनात २० नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे सादर करण्यात आली.
याच प्रदर्शनात आयुलिन्क स्मार्ट स्टेथोस्कोप (योग्य निदान करण्यासाठी ग्रामीण भागांतील रुग्णांच्या हृदयातील आणि फुप्फुसातील आवाज शहरांमधील डॉक्टरांना पाठविणारे उपकरण), डायबेटिक फूट स्क्रीनर (दीर्घकालीन अल्सरेशन आणि अँप्युटेशन टाळण्यासाठी) आणि हायब्रीड प्लास्टर स्प्लिंट (प्रवासात फ्रॅक्चर झालेल्या हाडाला इजा पोहोचू नये, हाड स्थिर राहण्यासाठी) यासारखी नावीन्यपूर्ण उपकरणे लक्षवेधी ठरली.

Web Title: The basis of 'Mlevible Calipers' for those who are not safe in step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.