पावसात अडकली बडोदा एक्स्प्रेस, एनडीआरएफच्या मदतीनं प्रवाशांना काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:08 PM2018-07-10T18:08:08+5:302018-07-10T21:21:43+5:30

मुंबईसह उपनगरांत कोसळणा-या पावसानं अक्षरशः रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.

Baroda Express stuck in the rain, passengers with help from NDRF | पावसात अडकली बडोदा एक्स्प्रेस, एनडीआरएफच्या मदतीनं प्रवाशांना काढलं बाहेर

पावसात अडकली बडोदा एक्स्प्रेस, एनडीआरएफच्या मदतीनं प्रवाशांना काढलं बाहेर

Next

मुंबई- मुंबईसह उपनगरांत कोसळणा-या पावसानं अक्षरशः रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक मेल व एक्स्प्रेस ट्रॅकवरच खोळंबल्या आहेत. नालासोपा-याजवळही 12928 बडोदा एक्स्प्रेस अडकून पडली होती. ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं प्रवाशांनी भरलेली ट्रेन नालासोपारा आणि विरारदरम्यान अडकली होती.

एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या मदतीनं प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर सुखरूप काढण्यात आलं. त्यानंतर प्रवाशांना बसच्या सहाय्यानं दुस-या स्टेशनांवर पोहोचवण्यात आलं. नालासोपारा ते वसईदरम्यान प्रचंड पावसाने अडकून पडलेल्या बडोदा एक्स्प्रेसमधल्या 1700 ते 2000 प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या जवानांच्या सहाय्याने सुटका केली. या प्रवाशांना नायगाव स्टेशनपर्यंत आरटीओच्या मदतीने खासगी बसेसची व्यवस्था करून आणण्यात आले, तसेच त्यांची जेवणाची सोय केली आहे. हतबल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनासुद्धा यामुळे दिलासा मिळाला आहे. एनडीआरएफचे जवान कुठल्याही अडथळ्याविना नालासोपारापर्यंत पोहचावे म्हणून ठाणे, पालघर पोलिसांनी ग्रीन कोरिडॉर तयार केला होता. एनडी आर एफचे एकूण 42 जवान होते. त्यांच्याकडे 6 बोटी होत्या. त्यातील 3 बोटीतून मिठाघर येथे अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली, त्यांना अण्णासाहेब वर्तक कॉलेज येथे सुखरूप पोहोचविण्यात आले. वसई पालिका, जीवदानी संस्था या सर्वांनी या कामगारांची काळजी घेतली आहे.नालासोपा-यातील ट्रॅकवर 400 एमएमपर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबई पोहोचणा-या अनेक लोकल खोळंबल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रवासी ट्रेनमध्येच अडकून पडलेत, तर मुंबईची गतीही धिमी झाली होती. रेल्वेच्या माहितीनुसार, 20 ट्रेन्सच्या फे-यांमधील अंतर कमी करण्यात आलं. 6 डाऊन आणि 7 अप मार्गावरील ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. 12951 मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता तीच ट्रेन रात्री 8 वाजता धावणार आहे. मुंबईहून दुस-या राज्यात जाणा-या 6 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच या मुसळधार पावसानं रेल्वे सेवाच नव्हे, तर विमान सेवाही प्रभावित झाली आहे. तसेच अनेक विमानांच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. रनवे बुळबुळीत झाल्यानं विमानाचं लँडिंग करताना वैमानिकांना त्रास सहन करावा लागतोय. 


Web Title: Baroda Express stuck in the rain, passengers with help from NDRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.