पोलिसांवरील हल्ले वाढले, हा गृहखात्याचा पराभव; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 07:58 AM2018-11-30T07:58:14+5:302018-11-30T08:04:22+5:30

राज्यात 2014 पासून  पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

The attacks on the police increased; Look at Uddhav Thackeray's Chief Minister | पोलिसांवरील हल्ले वाढले, हा गृहखात्याचा पराभव; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पोलिसांवरील हल्ले वाढले, हा गृहखात्याचा पराभव; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next
ठळक मुद्दे 2014 पासून  पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ... तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाहीसी.आय.डी.ने जी आकडेवारी चिंताजनक

मुंबई :  राज्यात 2014 पासून  पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पोलीस मार खात आहेत. हे चित्र असेच राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे : 
- महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, हा प्रश्न विचारला जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच उत्तम असते. त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्थेचा अर्थ वेगळा असतो. 
- दारू तस्कराने चंद्रपूर जिह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे फौजदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवून चिरडून मारले. चिडे यांची हत्या दारू तस्करीच्या वादातून झाली व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. 
- चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रियतेसाठी जिह्यात दारूबंदीची घोषणा केली; पण संपूर्ण विदर्भात दारूचा महापूर धोधो वाहत आहे.
- सी.आय.डी.ने जी आकडेवारी याबाबत प्रसिद्ध केली ती चिंताजनक आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत व कश्मीरात ज्याप्रमाणे पोलीस व सुरक्षा दलांवर हल्ले होत आहेत तसे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत. 
- सीआयडीच्या 2016 च्या गुन्हे अहवालानुसार 2015 मध्ये साधारण 370 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. 2016 मध्ये 428 पोलिसांवर हल्ले झाले. त्यात 56 पोलिसांना मरण पत्करावे लागले. सर्वाधिक पोलीस बळी चंद्रपुरात (11) गेले व त्यासाठी लादलेली दारूबंदी व दारू तस्करी हे मुख्य कारण आहे.
- 26/11 च्या हल्ल्यात अनेक बहाद्दर पोलीस अधिकारी व शिपायांनी हौतात्म्य पत्करले. फौजदार ओंबळे यांनी प्राणाची बाजी लावून हल्लेखोर अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडले. हे धैर्य हीच महाराष्ट्र पोलिसांची ओळख आहे. पण ती ओळख व पोलिसांचा दरारा पुसला जात असेल तर त्यासाठी राजकारणाने वर्दीवर केलेली मात जबाबदार म्हणावी लागेल.
- आझाद मैदानात धर्मांध दंगलखोरांनी पोलिसांवर हल्ले केले, पोलिसांची वाहने जाळली तेव्हा गदारोळ करणारा विरोधी पक्षच आज सत्ताधारी आहे व पोलीस पुनः पुन्हा मार खात आहेत. 
- भीमा-कोरेगाव दंगलीत पोलिसांच्या बंदुकांना पिचकाऱ्यांचे स्वरूप आल्याने पोलिसांची वाहने जाळली गेली. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याची वृत्ती सत्ताधारी पक्षाच्या लोकांत वाढली आहे. हे चित्र चांगले नाही.
- कायद्याला बाप व पोलीस ठाण्यांना मालक निर्माण होतात तेव्हा ते कायद्याचे राज्य नसते. गुंडांना, चोरांना राजकीय कार्यकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश मिळतो व पोलिसांनी ज्यांना काल गुंड म्हणून ठोकलेले असते त्या गुंडांनाच सलाम करावा लागतो.

Web Title: The attacks on the police increased; Look at Uddhav Thackeray's Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.