पॅरोलवर पसार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:44 AM2018-12-14T05:44:19+5:302018-12-14T05:44:35+5:30

दोन वर्षांनंतर आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Atrocities on a minor girl after its parole | पॅरोलवर पसार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पॅरोलवर पसार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

googlenewsNext

मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात पॅरोलवर पसार झालेल्या आरोपीने पुण्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तो पसार झाला. अखेर दोन वर्षांनंतर तो गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या जाळ्यात अडकला. सुजीत कुराडे (३५) असे आरोपीचे नाव आहे.

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या कुराडेने राजकीय वैमनस्यातून २०११ मध्ये ठाण्याच्या किसननगर येथील आरपीआय पक्षाचे शिवा रघुनाथ जैस्वाल यांची दोन भावांच्या मदतीने हत्या केली. न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. २०१२ पासून कुराडेसह भावांची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

६ आॅक्टोबर २०१६ ते ४ नोव्हेंबर २०१६ दरम्यान पॅरोलवर तो बाहेर आला. मात्र पुन्हा हजर झाला नाही. त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आनंद बागडे यांना कुराडे हा पुण्यात नातेवाइकांकडे येणार असल्याची माहिती मिळाली. बागडे यांनी पोलीस अंमलदार ताजणे, मोरे यांच्यासोबत पुण्यात सापळा रचून त्याला अटक केली. तपासादरम्यान कुराडेने याच वर्षी पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. या प्रकरणी पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर पॉक्सो, अपहरण, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Atrocities on a minor girl after its parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.