काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 12:54 PM2018-10-21T12:54:03+5:302018-10-21T12:54:54+5:30

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

ashok chavhan on congress ncp alliance for loksabha election | काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात?

काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात?

Next

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. जागा वाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणनीती आखण्यास हालचाली वेग धरू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू असून जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. शनिवारी (20 ऑक्टोबर) रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. 

दरम्यान, बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला. 
नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?
उद्धव ठाकरे दरदिवशी नवनवीन विधानं करताहेत. अयोध्या प्रकरणासंदर्भात शिवसेना कधीही गंभीर नव्हती. निवडणुका जवळ येत असल्यानं वारंवार अयोध्या प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 




Web Title: ashok chavhan on congress ncp alliance for loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.