तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 09:41 AM2023-12-22T09:41:36+5:302023-12-22T09:42:31+5:30

बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

are you get a free gift for christmas and new year beware about frudeant calls and apps | तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

मुंबई :नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर भामट्यांकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह, पेटीएम, फोन पे, गुगल पे यांसारखे बनावट ॲपद्वारेही ठगीचा धंदा सुरू असल्याचे सायबर पोलिसांच्या निरीक्षणात समोर आले आहे. त्यामुळे अशा बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

गेल्या ११ महिन्यात सायबर संबंधित ३ हजार ८८८ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी ७०७ गुन्ह्यांची उकल करत ९३६ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सायबर फसवणुकीचे सर्वाधिक २ हजार ५७ गुन्ह्यांची नोंद आहे.  यापैकी अवघ्या २९५ गुन्ह्यांची उकल ४३३ आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. त्यासोबतच नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षानिमित्ताने सोशल मीडियावर विविध ऑफरसह फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही मधाळ आमिषाला बळी न पडता, अनोळखी लिंकवर क्लिक 
करू नये. 

प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.

गुगलची गुगली :

गुगलवरील तपशील अचूक असण्यासाठी गुगलने सजेस्ट ॲन एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. ऑनलाईन ठगांनी हा पर्याय वापरून संकेतस्थळावरील अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे.

समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून नागरिकांकडे बँकेने कार्ड ब्लॉक केल्याची भीती घालून डेबिट-क्रेडिट कार्डाची माहिती घेतात.  त्याआधारे ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढतात.

आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर विभागाने नागरिकांना केले आहे, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

...वाचू शकतात पैसे

   सायबर सेलच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यात काम चालते. सध्या फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच.

  त्याच वेळेस दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते, तर काही प्रकरणात विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसते. 

  अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली लिमिट, ऑनलाईन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यास तात्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने  संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.

Web Title: are you get a free gift for christmas and new year beware about frudeant calls and apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.