आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगला अॅप्लिकेशनची जोड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 01:31 PM2018-02-28T13:31:10+5:302018-02-28T13:31:10+5:30

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. त्यातच आता रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्या आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे कॅटरिंग अ‍ँड टुरिझम कॉर्पोरेशन) ला रेझर पे या नव्या अॅप्लिकेशनची जोड मिळणार आहे.

Application link for IRCTC ticket booking | आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगला अॅप्लिकेशनची जोड

आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगला अॅप्लिकेशनची जोड

Next

मुंबई : रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. त्यातच आता रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्या आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे कॅटरिंग अ‍ँड टुरिझम कॉर्पोरेशन) ला रेझर पे या नव्या अॅप्लिकेशनची जोड मिळणार आहे. याकरिता करार करण्यात आला असून ग्राहकांना आयआरसीटीसी ही वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, नेट बँकिंग, वॉलेट्स, क्रेडिट तसेच डेबिट कार्डांद्वारे ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही ग्राहकाला त्याच्याकडे मोबाईल फोन तसेच बँक खाते असताना युपीआयद्वारे (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) रेल्वे तसेच विमानाची तिकिटे ऑनलाइन आरक्षित करता येतील. या यंत्रणेत ग्राहकांना आपल्या कार्डाचा तपशील भरण्याची तसेच नेट बँकिंग-वॉलेटचा पासवर्डदेखील भरावा लागणार नाही.

रेजर पेने ग्राहकांना युपीआयद्वारे डिजिटल पैशांच्या सुलभ हस्तांतरणासाठी आयआरसीटीसीबरोबर हातमिळवणी केली आहे. त्याचा लाभ डिजिटल पेमेंट प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल. उत्तम तंत्रज्ञान असलेल्या या प्रणालीत सुरक्षाविषयक देखील काळजी घेण्यात आली आहे. आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अ‍ॅपवर रेजर पेही कंपनी दर महिन्याला १० लाखांहून अधिक व्यवहार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये रेल्वेप्रवाशांचा आकडा गतवर्षीच्या तुलनेत ३ कोटींनी वाढला आहे. त्यामुळे रेजर पेच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे होणार असल्याचे रेजर पेचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर यांनी सांगितले.
----------------
गेल्या वर्षी रिटेल डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये युपीआयची सर्वात मोठी वृद्धी झाली. गेल्या जानेवारी महिन्यात १५ कोटी १० लाख एवढे व्यवहार युपीआयद्वारे झाले. ही वाढ ४० टक्क्यांएवढी आहे.

Web Title: Application link for IRCTC ticket booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.