एफवाय प्रवेशाची दुसरी यादी आज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:18 AM2018-07-14T06:18:14+5:302018-07-14T06:18:25+5:30

एफवाय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी शनिवार, १४ जुलै रोजी जाहीर होईल. दुसऱ्या यादीनंतर तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै रोजी जाहीर होईल.

Another list of FY access is today | एफवाय प्रवेशाची दुसरी यादी आज

एफवाय प्रवेशाची दुसरी यादी आज

Next

मुंबई : एफवाय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी शनिवार, १४ जुलै रोजी जाहीर होईल. दुसऱ्या यादीनंतर तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै रोजी जाहीर होईल. दुस-या गुणवत्ता यादीसाठीची कागदपत्र पडताळणी आणि शुल्क प्रक्रिया १६, १७ आणि १८ जुलैपर्यंत विद्यार्थी पूर्ण करू शकतात.
१९ जून रोजी पदवी प्रवेशांसाठी प्रथम गुणवत्ता यादी जाहीर झाली. मात्र, तेव्हा मागासवर्गीय कोट्याचा निर्णय आल्याने, अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश अर्ज केलेल्या मागसवर्गीय विद्यार्थ्यांना यादीत स्थान मिळाले नसल्याने, मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुकारले. त्यानंतर, गुणवत्ता यादीला स्थगिती देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष (एफवाय) प्रवेशाच्या पहिल्या यादीत अनेक नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ नव्वदीपार गेला. त्यामुळे मुंबई विद्यापीठ संलग्नित अनेक नामांकित महाविद्यालयातील इनहाउस प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या वाढीव अर्जांमुळे दुसºया यादीसाठी मर्यादित जागा शिल्लक आहेत. त्यामुळे बºयाच महाविद्यालयांमधील प्रवेश दुसºया यादीनंतर बंद होण्याची शक्यता प्राचार्यांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Another list of FY access is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.