अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल मधील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 05:10 AM2018-12-18T05:10:46+5:302018-12-18T05:11:18+5:30

केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांनी घेतली आगीची गंभीर दखल

Annual release of 10 lakhs for the family of the dead in Andheri's workers hospital | अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल मधील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर

अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल मधील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलला सोमवारी दुपारी लागलेल्या आगीतील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत तर, गंभीर जखमी झालेल्यांना 2 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 1 लाखांची आर्थिक मदत  कामगार व रोजगार विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री(स्वतंत्र कारभार) यांनी जाहिर केली आहे.
केंद्र सरकारने या आगीची गंभीर दखल घेतली असून केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांनी दिल्लीत या आगीच्या दुर्घटने नंतर काल कामगार व इएसआयएस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची
तातडीची बैठक बोलावली होती.या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शक्य होईल तितकी मदत करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी या बैठकीत दिले.

आज सकाळी मंत्रीमहोदय आणि त्यांच्या बरोबर या खात्याचे सचिव आणि इएसआयएस डायरेक्टर जनरल हे मदतकार्याची पाहणी करण्यासाठी कामगार हॉस्पिटल मध्ये येत आहे.यावेळी ते हॉस्पिटल मध्ये जाऊन जखमींना भेटणार आहेत.तर जखमींच्या मदतीसाठी इएसआयएसच्या डॉक्टरांचे खास पथक मुंबईला येत आहे.

या आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत असून प्राथमिक अहवालानुसार येथील नव्या इमारतीचे काम सुरू असून त्याचे भंगार साहित्य हे तळ मजल्याच्या असलेल्या गोदमात ठेवण्यात आले होते त्याला आग लागली.आणि आगीच्या धुरांचे लोट येथे पसरल्याने त्यात 6 जणांचा दुर्दवी मृत्यू झाला तर 147 जण जखमी झाले.तर हॉस्पिटलच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा वर्मा या बचाव कार्य करत असतांना त्यांना आगीत गुदमरून चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.  

Web Title: Annual release of 10 lakhs for the family of the dead in Andheri's workers hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.