ऑनलाइन दुबार परीक्षेची घोषणा 'नीट' गुंडाळली, सरकारने केलाय 'हा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:47 PM2018-08-21T21:47:48+5:302018-08-21T21:55:46+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2019 पासून नीट परिक्षा वर्षातून दोनदा तीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. घोषणा करताना विद्यार्थ्यांना दिलासा आणि आमूलाग्र बदलाचा दावाही करण्यात आला. परंतु, महिनाभरातच

The announcement of the online duplication test is 'NEET' cancelle, Now using pen and paper for the exam | ऑनलाइन दुबार परीक्षेची घोषणा 'नीट' गुंडाळली, सरकारने केलाय 'हा' बदल

ऑनलाइन दुबार परीक्षेची घोषणा 'नीट' गुंडाळली, सरकारने केलाय 'हा' बदल

Next

मुंबई - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2019 पासून नीट परिक्षा वर्षातून दोनदा तीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. घोषणा करताना विद्यार्थ्यांना दिलासा आणि आमूलाग्र बदलाचा दावाही करण्यात आला. परंतु, महिनाभरातच सरकारने आपल्या निर्णयातून 'नीट' माघार घेत ऑनलाइन दुबार परीक्षा घेण्याचा निर्णयही गुंडाळला आहे. त्यामुळे, नीट परीक्षा ऑनलाइन होणार नसून कागद पेनावरच होणार आहेत. मात्र, अभियांत्रिकी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परिक्षा (JEE) ही वर्षातून दोनदा होईल. 

सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता नीट परिक्षा पूर्वीप्रमाणे पेन पेपरद्वारे होईल. नीट परिक्षा ऑनलाइन घेण्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेल, हे कारण सरकारकडून पुढे केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय आरोग्य खाते आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्यातील विसंवादातून हा घुमजाव करावा लागला असल्याचेही दिसते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने तसा आक्षेप नोंदविल्याचेही वृत्त होते. 

अधिक माहितीसाठी वाचा - 

दोन मंत्रालयांचा ‘नीट’ वाद

Web Title: The announcement of the online duplication test is 'NEET' cancelle, Now using pen and paper for the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.