'राजकारणात नुसती दादागिरी ...'; इंग्रजीतील प्रश्नावर नारायण राणे गडबडले, दमानियांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:00 PM2024-02-06T20:00:56+5:302024-02-06T20:02:19+5:30

लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीमध्ये त्यांच्या खात्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

Anjali Damaniyas criticized on Narayan Rane | 'राजकारणात नुसती दादागिरी ...'; इंग्रजीतील प्रश्नावर नारायण राणे गडबडले, दमानियांनी लगावला टोला

'राजकारणात नुसती दादागिरी ...'; इंग्रजीतील प्रश्नावर नारायण राणे गडबडले, दमानियांनी लगावला टोला

मुंबई- लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीमध्ये त्यांच्या खात्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी नारायण राणे यांना प्रश्न कळाला नाही त्यामुळे त्यांनी गडबडल्याचे दिसले. यावळी त्यांनी भलतेच उत्तर दिल्याचे दिसले. याबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर शेअर करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. 

"नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला. MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार’ हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार ? नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात  आणि बॉस चा वर्धास्त फार काळ चालत नाही, असा टोलाही अंजली दमानियाा यांनी राणे यांना लगावला. 

सभागृहात नारायण राणे यांना खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीमध्ये प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारले की, MSME क्षेत्रात कामगार कल्याणसाठी काय पावलं उचलणार? या प्रश्नावर राणे गडबडले त्यांना नेमका प्रश्नच कळाला नाही. त्यांनी उत्तरात म्हणाले की, MSME क्षेत्राला चालणा देण्यासाठी आपण काय काय केलं याची यादी त्यांनी वाचून दाखवू इच्छितो अशी सभापतींना परवानगी मागितली. 

यावेळी राणे यांना प्रश्नच कळाला नाही त्यामुळे त्यांनी उत्तर सोडून आपल्या खात्याची माहिती द्यायला सुरुवात केली. यावेळी विरोधकांनी गोंधळ सुरू केला. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी केली. यानंतर सभापतींनी मध्यस्ती केली आणि हिंदीतून प्रश्न सांगितला. राणे म्हणाले की, "मी वाचून दाखवतो आहे ते उद्योग सुरु झाल्यानंतर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. फॅक्टरीज जर बंद राहिल्या तर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत का? यावरुन आता राजकीय वर्तळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही टीका केली. 

Web Title: Anjali Damaniyas criticized on Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.