अमित शहा घेणार माधुरी दीक्षितची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:19 AM2018-06-06T09:19:39+5:302018-06-06T09:25:07+5:30

भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या मातोश्रीच्या पायऱ्या चढणार असल्याने या चर्चेला एकच उधाण आलंय, मात्र मातोश्रीच नव्हे तर अमित शहा उद्या अभिनेत्री माधुरी दीक्षितचीही भेट घेणार आहेत.

Amit Shah To Meet Ratan Tata, Lata Mangeshkar, Madhuri Dixit Today | अमित शहा घेणार माधुरी दीक्षितची भेट

अमित शहा घेणार माधुरी दीक्षितची भेट

Next

मुंबई - भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याशिवाय प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनाही अमित शहा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणार आहेत. भाजपाच्या संपर्क अभियानाचा हा भाग आहे.

भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, 26 मे ते 11 जून दरम्यान समाजातील नामवंत मंडळींना भेटण्यासाठी पक्षाने  'संपर्क फॉर समर्थन' अभियान हाती घेतले आहे. त्याचा भाग म्हणून मित्रपक्षांचे नेते आणि समाजातील मान्यवर लोकांना अमित शहांसह अन्य नेते भेटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरेयांच्यासह रतन टाटा,  लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत. याअंतर्गत शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत. 

'संपर्क फॉर समर्थन' या मोहिमेअंतर्गत ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांना भाजपचं काम समजावून सांगत आहेत तसेच भविष्यात भाजपला समर्थन देण्याची विनंती करत आहेत.

Web Title: Amit Shah To Meet Ratan Tata, Lata Mangeshkar, Madhuri Dixit Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.