बंदीनंतरही मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दररोज चारशे मेट्रिक टन कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:48 AM2018-12-05T00:48:23+5:302018-12-05T00:48:41+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंड आॅक्टोबरपासून कचरामुक्त होणार होते.

After the ban, four hundred metric tonnes of garbage per day on Mulund dumping ground | बंदीनंतरही मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दररोज चारशे मेट्रिक टन कचरा

बंदीनंतरही मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दररोज चारशे मेट्रिक टन कचरा

Next

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंड आॅक्टोबरपासून कचरामुक्त होणार होते. तशी तयारीही महापालिकेने सुरू केली. मात्र, आजही या कचराभूमीवर दररोज चारशे मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे. गेल्या आठवड्यात या डम्पिंग ग्राउंडवर काचऱ्याला आग लागण्याची घटना पुन्हा घडली. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) आवश्यक परवानगी न मिळाल्यामुळे, या ठिकाणी कचरा टाकणे आणखी काही काळ सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाक मुठीत घेऊनच राहावे लागणार आहे.
मुंबईत दररोज जमा होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी चार डम्पिंग ग्राउंड होते. यापैकी गोराई डम्पिंग ग्राउंडला २००७ मध्येच टाळे लावण्यात आले, तर कचºयाच्या दुर्गंधीमुळे मुलुंडकरांचे आरोग्य बिघडल्यामुळे गेली अनेक वर्षे मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी होत आहे. या डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याचे प्रकारही अनेक वेळा घडले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन मुलुंड डम्पिंग ग्राउंड १ आॅक्टोबरपासून बंद करण्याचे आदेश दिले. याचा जल्लोषही स्थानिक रहिवाशांनी केला. मात्र, कचºयाच्या दुर्गंधीतून अद्याप त्यांची सुटका झालेली नाही.
कचºयाचे छोटे-छोटे कॉम्पॅक्टर्स मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दररोज
जात आहेत. ही स्थानिक नागरिकांची फसवणूक आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा
आरोप स्थानिक नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मात्र, एमपीसीबीने जमा होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे कचरा, बांधकाम साहित्य, माती या कचराभूमीवर टाकण्यात येत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी न मिळाल्यामुळे, त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी स्पष्ट केले.
>७० लाख मेट्रिक टन कचरा उपसणार!
>मुलुंड कचराभूमीवरील ७० लाख मेट्रिक टन कचरा उपसण्यासाठी महापालिकेने जूनमध्ये ठेकेदार नेमला. त्यानुसार, पुढील सहा वर्षांत ७३१ कोटी रुपये खर्च करून, टप्प्याटप्प्याने मुलुंड कचराभूमी बंद करण्यात येणार आहे.
याआधी मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेने अनेक वेळा निविदा मागविल्या. मात्र, ठेकेदारांनी स्वारस्य न दाखविल्याने हा प्रकल्प रखडला होता. अखेर तीन वेळा निविदा मागविल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एका ठेकेदाराने मुलुंड कचराभूमी बंद करण्याच्या कामात स्वारस्य दाखविले आहे.
मुंबईतून जमा होणाºया कचºयाचे प्रमाण दोन हजार ३०० मेट्रिक टन एवढे घटले आहे. त्यामुळे आता दररोज सुमारे सात हजार २०० मेट्रिक टन कचरा जमा होतो, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. हा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार कचरा भूमीवर टाकण्यात येतो. १९६७ पासून २४ हेक्टर परिसरात असलेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर सुमारे दीड ते दोन हजार मेट्रिक टन कचरा रोज टाकला जात होता. या डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाचा ढीग ३० मीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

Web Title: After the ban, four hundred metric tonnes of garbage per day on Mulund dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.