'अवनीसंदर्भात खोटी माहिती दिल्यास कारवाई होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:51 AM2018-11-15T06:51:01+5:302018-11-15T06:51:21+5:30

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार : ‘अवनी’संदर्भातील बिनबुडाचे आरोप

'Action will be taken if false information is lodged against Avani' | 'अवनीसंदर्भात खोटी माहिती दिल्यास कारवाई होणार'

'अवनीसंदर्भात खोटी माहिती दिल्यास कारवाई होणार'

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई : अवनी या नरभक्षक वाघिणीला मारल्यानंतर या विषयावर अभ्यास नसणारेही सोशल मीडियातून वाट्टेल ते आरोप व व्यक्तिगत निंदानालस्ती करत आहेत. शहानिशा न करता तर्क काढून बेछूट आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

लोकमतशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणानंतर अनेकांनी ते वनक्षेत्र ठराविक उद्योजकांंना द्यायचे आहे इथपासून अनेक आरोप करणे
केले आहे. कोणतीही शहानिशा न करता बेछूट आरोप करुन सरकारची बदनामी करण्याचे काम काही ठराविक लोक करत आहेत. सोशल मीडियातून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. वन्यजीव अभ्यासक या कृतीच्या बाजूने आहेत; मात्र वन्यप्रेमींच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम काही लोक करत असल्याचेही ते म्हणाले.

येत्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात ते म्हणाले, सरकारने ७ व्या वेतन आयोगासाठी व शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येकी १० हजार कोटींची तरतूद आहे. बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्यानंतर ३३०० कोटी राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीतून दिले. त्यासाठी केंद्राची मदत घेतली नाही. आजपर्यंत आपण १,२५,००० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. मात्र आघाडी सरकारच्या काळात ही संख्या १,४२,००० कोटी होती. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी पुरवणी मागण्यातून निधी मंजूर करुन घेतला जातो. मागच्या तुलनेत या वेळी बजेट कमीच आहेत असे सांगून ते म्हणाले, २००५ साली आघाडी सरकारने ओव्हरड्राफ्ट काढला. त्यानंतर एकदाही ओव्हरड्राफ्ट काढण्याची वेळ सरकारवर आलेली नाही.

मंत्रिमंडळात केवळ चर्चा-मुख्यमंत्री
यवतमाळात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठलाही वादंग झाला नाही. केवळ चर्चा झाली. सध्या स्वतंत्र चौकशी समिती गठित झाली असल्याने अधिक भाष्य करणे उचित नाही; मात्र अवनीच्या पोस्टमॉर्टम अहवालातील काही निष्कर्षाच्या आधारे हा वाद पेटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात तथ्य नाही. मनेका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला येथे दिली.

Web Title: 'Action will be taken if false information is lodged against Avani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.