कुत्री चावली म्हणून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 30, 2016 03:44 IST2016-12-30T03:44:26+5:302016-12-30T03:44:26+5:30

दादर परिसरात कुत्री चावल्याने जखमी महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी कुत्रीच्या मालकावर गुन्हा दाखल करून

The accused filed a criminal case against the owner | कुत्री चावली म्हणून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुत्री चावली म्हणून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : दादर परिसरात कुत्री चावल्याने जखमी महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी कुत्रीच्या मालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुरब निहलानी (३६) असे मालकाचे नाव आहे.
सेनापती बापट मार्गावरील सदगुरू कृपा सोसायटीत वेदवती योगेश पांडे कुटुंबीयांसोबत राहतात. याच इमारतीत पुरब निहलानी राहतात. निहलानी यांच्याकडे जेनी नावाची कुत्री आहे. पांडे यांचा लहान मुलगा या जेनी नावाच्या कुत्रीसोबत खेळत होता. मात्र ही कुत्री चावेल म्हणून वेदवती या मुलाला परत घेऊन जात होत्या.
त्याच दरम्यान कुत्रीने त्यांच्या हातावर चावा घेतला. यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये वेदवती या जखमी झाल्या. त्यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून निहलानीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The accused filed a criminal case against the owner