मंदिर बांधणीच्या नावाखाली ९८ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:27 AM2018-08-06T05:27:50+5:302018-08-06T05:27:59+5:30

गावदेवी परिसरातील मंदिर बांधणीसाठी केलेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल लाटून ९८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

98 lakh cheating under the name of temple construction | मंदिर बांधणीच्या नावाखाली ९८ लाखांची फसवणूक

मंदिर बांधणीच्या नावाखाली ९८ लाखांची फसवणूक

Next

मुंबई : गावदेवी परिसरातील मंदिर बांधणीसाठी केलेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल लाटून ९८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गावदेवी परिसरात तक्रारदार राजेंद्र मेहता (६४) राहण्यास आहे. त्यांनी गावदेवी येथील मार्बलचे मंदिर बांधणीचे काम खुर्शीदबाई शिसोदीया आणि कांतीलाल सामपुरा यांच्याकडे दिले होते. २२ फेब्रुवारी २०१६ ते २१ जानेवारी २०१८ पर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे ५ कोटी ४५ लाख २३ हजार ९२ रुपयांचे बिल सोपविले. मात्र, प्रत्यक्षात केलेले काम कमी होते. यामध्ये एकून त्यांनी ९८ लाख रुपये जास्तीचे लाटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मेहता यांनी केली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, गावदेवी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: 98 lakh cheating under the name of temple construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर