मुंबई अग्निशमन दलात जवानांची ९०० पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:18 AM2018-12-19T04:18:50+5:302018-12-19T04:19:28+5:30

कामाचा ताण वाढतोय : सव्वा कोटी मुंबईकरांच्या तुलनेत केवळ ३४ अग्निशमन केंद्रे

9 00 posts of fire brigade personnel empty | मुंबई अग्निशमन दलात जवानांची ९०० पदे रिक्त

मुंबई अग्निशमन दलात जवानांची ९०० पदे रिक्त

Next

मुंबई : आगीच्या दुर्घटनेत जिवाची पर्वा न करता, मदत कार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांवर कामाचा ताण वाढतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटना वाढत असताना जवानांची संख्या मात्र मर्यादितच आहे. अग्निशमन दलात जवानांची रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबईतील सव्वा कोटी लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३४ अग्निशमन केंद्र आहेत. जवान व अधिकाºयांची संख्या जेमतेम तीन हजार आहे. आगीच्या दुर्घटनेत मदत कार्य एवढेच नव्हे, तर इमारत कोसळणे, पूर, झाडावर पक्षी अडकणे आदी सर्व अन्य अडचणींतही अग्निशमन दलातील जवानांना धावावे लागते. या जवानांवर कामाचा ताण अधिक आहे. अग्निशमन दलात ३,८०७ अधिकारी व कर्मचाºयांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी २,८८० पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित ९२७ पदे रिक्त आहेत. ही पदेतातडीने भरण्यात यावी, अशी
मागणी होत आहे. मधल्या काही काळात अग्निशमन दलाने नवीन भरती केली. मुंबईत लोकसंख्येप्रमाणे शंभर अग्निशमन केंद्रे हवी असून,
त्या तुलनेतच जवानांची आवश्यकता आहे.

ही पदे रिक्त
उपप्रमुख अग्निशमन अधिकारी ०१, विभागीय अग्निशमन अधिकारी ०३, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी ०३, वरिष्ठ केंद्र अधिकारी २०, केंद्र अधिकारी २६, सहायक केंद्र अधिकारी ८०, सहायक केंद्र अधिकारी (संदेश) ०२, दुय्यम अधिकारी ६५, प्रमुख अग्निशमन ६६, यंत्रचालक १३४, अग्निशमन ५५९, रेडिओ मॅकेनिक ०८.

एकूण पदे - ३,८०७ । जवानांची संख्या - २,८८०
 

Web Title: 9 00 posts of fire brigade personnel empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.