८५७ कोटींचा अर्थसंकल्प मुंबई विद्यापीठाच्या बजेटला सिनेटमध्ये मंजुरी, १२१ कोटींची तूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:52 AM2024-03-24T05:52:05+5:302024-03-24T05:52:19+5:30

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १२१ कोटी ६० लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

857 Crore Budget Senate approves Mumbai University budget, 121 Crore deficit | ८५७ कोटींचा अर्थसंकल्प मुंबई विद्यापीठाच्या बजेटला सिनेटमध्ये मंजुरी, १२१ कोटींची तूट

८५७ कोटींचा अर्थसंकल्प मुंबई विद्यापीठाच्या बजेटला सिनेटमध्ये मंजुरी, १२१ कोटींची तूट

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२४-२५ या वित्तीय वर्षाचा ८५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी झालेल्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १२१ कोटी ६० लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

या बजेटमध्ये गुणवत्ता, सर्वसामावेशकता आणि उत्कृष्टता उपक्रम, संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीचे बळकटीकरण, उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रम यांसह शैक्षणिक आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता उपक्रमांसाठी ६५ कोटींची भरीव तरतूद केली आहे, तर विविध विकासकामांकरिता १२३ कोटींची तरतूद केली आहे.

विद्यार्थी संख्येत ३० टक्क्यांची घट 
  मुंबई विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विषय विभाग आणि दूरस्थ शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१४-१५ या वर्षात विद्यापीठात ८७,०६४ विद्यार्थी शिकत होते. 
  दहा वर्षांत हा आकडा ६६,९९० वर आला आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या २२ टक्क्यांनी वाढून ६,१४,१२८ वरून ७,८७,०२६ वर गेली आहे. एकूण विद्यार्थी संख्या वाढली असली, तरी विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

  पदवीधरांच्या निवडणुका रखडल्याने गेली तीन वर्षे पदवीधरांचे सिनेटवर प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर या सिनेटमध्ये म्हणावा तसा आवाज उठवला गेला नाही. बैठकीतील इतर सदस्यांकडून विचारलेल्या कपातीच्या सूचना, स्थगन प्रस्तावांवर फारशी चर्चा न होता ते मागे घेण्यात आले. 

Web Title: 857 Crore Budget Senate approves Mumbai University budget, 121 Crore deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.