चेन पुलिंग करणाऱ्या ७९३ प्रवाशांना दंड! १९८ गाड्यांना लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:31 AM2023-12-10T06:31:46+5:302023-12-10T06:31:55+5:30

प्रवासादरम्यान संकटकाळ उद्भवल्यास मदतीसाठी साखळी खेचण्यास मुभा आहे, गरज नसतानाही साखळी खेचण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

793 chain pulling passengers fined Latemark for 198 trains | चेन पुलिंग करणाऱ्या ७९३ प्रवाशांना दंड! १९८ गाड्यांना लेटमार्क

चेन पुलिंग करणाऱ्या ७९३ प्रवाशांना दंड! १९८ गाड्यांना लेटमार्क

मुंबई : प्रवासादरम्यान संकटकाळ उद्भवल्यास मदतीसाठी साखळी खेचण्यास मुभा आहे, गरज नसतानाही साखळी खेचण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मध्य रेल्वे मार्गावर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ७९३ जणांनी कारण नसताना साखळी खेचली. या सर्वांकडून २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई विभागात कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कसारा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि आंबिवली – टिटवाळा येथे साखळी खेचण्याच्या घटना वारंवार घडतात.

  एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १०७५ गाड्या उशिराने धावल्या. यामध्ये मुंबई विभागातील ३४४ मेल/एक्स्प्रेस गाड्या, भुसावळ विभागात ३५५ गाड्या, नागपूर विभागात २४१ गाड्या, पुणे विभागात ९६ गाड्या विभाग आणि सोलापूर विभागात ३९ गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये ७९३ व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे ८.२९ टक्के वक्तशीरपणावर परिणाम होतो.

१९८ गाड्यांना लेटमार्क

            केवळ नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेवर, साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १९८ गाड्या उशिराने धावल्या आणि गाड्यांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला.

            मुंबई विभागात ७३ मेल/एक्स्प्रेस, भुसावळ विभागात ५३, नागपूर विभागात ३४, पुणे विभागात ३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांचा समावेश आहे.

            मुंबई उपनगरात, संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज १२ उपनगरीय गाड्यांना उशीर होतो आणि वक्तशीरपणाचे नुकसान १६.५० टक्के होते.

कोणत्या गाड्यांना सर्वाधिक फटका?

 पनवेल - गोरखपूर एक्स्प्रेस

 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल (मार्गे - अलाहाबाद)

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल

Web Title: 793 chain pulling passengers fined Latemark for 198 trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.