म्हाडाच्या सात हजार १०३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; नाशिकची आज लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:00 AM2019-05-29T06:00:53+5:302019-05-29T06:01:04+5:30

मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद मंडळांच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण ७ हजार १०३ घरांच्या सोडतीची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे.

7 thousand 103 houses of MHADA declared release date; Today's lottery of Nashik | म्हाडाच्या सात हजार १०३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; नाशिकची आज लॉटरी

म्हाडाच्या सात हजार १०३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; नाशिकची आज लॉटरी

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद मंडळांच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण ७ हजार १०३ घरांच्या सोडतीची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. मुंबईतील सोडत २ जून, नाशिक २९ मे, पुणे ७ जून तर औरंगाबाद मंडळाची सोडत ४ जून रोजी पार पडणार आहे.
मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण २७४ गाळ्यांची लिलाव पद्धतीने आॅनलाइन बोली २९ ते ३१ मेदरम्यान होणार असून, १ जूनला याची सोडत जाहीर होईल. यामध्ये मुंबईतील १९७, तर कोकणातील ७७ दुकाने आहेत. मुंबईतील घरांत चेंबूरच्या शेल टॉवरमध्ये १७१ घरे, तर पवईतील ४६ घरांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नव्या नियमांनुसार ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामध्ये सूट मिळणार असल्याने म्हाडाला जेवढा फायदा होईल, तेवढी सूट सेवा शुल्कामध्ये देण्याचा विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले असल्याचे सामंत या वेळी म्हणाले.
>‘रत्नागिरीत नाट्यगृह उभारणार’
दरम्यान, म्हाडाच्या रत्नागिरीतील मोकळ्या जमिनींवर नाट्यगृहे, सभागृह, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, मनोरंजन मैदाने असे विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी मुंबईतील म्हाडाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ४०० आसनांची ही नाट्यगृहे खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा मानस असून, यातून म्हाडाला महसूल मिळणार आहे. उपरोल्लेखीत सर्व प्रकल्पांसाठी २० ते २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
>विविध मंडळातील
घरांची संख्या
मंडळ एकूण घरे दाखल अर्ज
मुंबई २१७ ६६,०७८
पुणे ४,७५६ ४१,५००
नाशिक १,२१३ २,६१९
औरंगाबाद ९१७ ७३,३०७

Web Title: 7 thousand 103 houses of MHADA declared release date; Today's lottery of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा