मुंबईच्या समुद्रात ४९ किलो प्लॅस्टिक, रत्नागिरीत २० किलो, विशाखापट्टणममध्ये अवघा २ किलो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:36 AM2019-02-06T04:36:34+5:302019-02-06T04:37:02+5:30

केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन केंद्राच्या अभ्यासानुसार मुंबईच्या समुद्रातील मत्स्य क्षेत्रात ४९ किलो प्लॅस्टिक कचरा आढळतो.

49 kg of plastic in Mumbai sea, 20 kg in Ratnagiri, 2 kg in Visakhapatnam | मुंबईच्या समुद्रात ४९ किलो प्लॅस्टिक, रत्नागिरीत २० किलो, विशाखापट्टणममध्ये अवघा २ किलो

मुंबईच्या समुद्रात ४९ किलो प्लॅस्टिक, रत्नागिरीत २० किलो, विशाखापट्टणममध्ये अवघा २ किलो

Next

- सागर नेवरेकर

मुंबई - केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन केंद्राच्या अभ्यासानुसार मुंबईच्या समुद्रातील मत्स्य क्षेत्रात ४९ किलो प्लॅस्टिक कचरा आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात २० किलो प्लॅस्टिक कचरा आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ प्रति चौरस किलोमीटरमध्ये ३७ किलो प्लॅस्टिक कचरा आढळतो. विशाखापट्टनम्च्या समुद्रात अवघा २.२ किलो प्लॅस्टिक कचरा आढळतो. परिणामी, मुंबईतील मच्छीमारांच्या जाळ््यात मासे कमी पण प्लॅस्टिक अधिक असते.

पहिल्यांदा मुंबईच्या समुद्रात किनारपट्टीपासून दहा मीटरपर्यंत प्लॅस्टिक आढळून येत होते. आता किनारपट्टीपासून ३० मीटरवरही प्लॅस्टिक दिसून येते. सद्यस्थितीला किनापट्टीपासून १०-२० किलोमीटरपर्यंत प्लॅस्टिक सापडते. याचा सर्वात मोठा धोका लहान मच्छीमारांना बसतो. समुद्रात जवळपास मच्छीमार करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ््यात प्लॅस्टिक अधिक आढळते. मच्छीमारांनी समुद्रात सापडलेले प्लॅस्टिक किनाºयावर आणून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

सरकारने अशा प्रकारची एखादी योजना तयार करावी. योजनेमार्फत समुद्रातला प्लॅस्टिक कचरा कमी होण्यास मदत होईल. मच्छीमारांच्या जाळ््यात दिवसभरात किमान २० किलो प्लॅस्टिक अडकून राहते. तेच जर किनाºयावर आणून योग्यरित्या विल्हेवाट करण्यासाठी सरकारने मच्छीमारांना कचºयाचे डब्बे आणि जागा उपलब्ध करुन दिले पाहिजे, अशी माहिती केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन केंद्रातील एका अधिकाºयाने नाव न देण्याच्या अटीवर दिली.

सुक्ष्म प्लॅस्टिकचा माशांना त्रास होतो. माशांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यावर त्यांच्या शरीरावर याचा परिणाम होतो. प्लॅस्टिकमुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. इतर राज्याच्या समुद्र किनारपट्टीपेक्षा मुंबईतील किनारपट्टीवर प्लॅस्टिक अधिक आढळून येते.

राज्यसभेतही काही दिवसांपूर्वी समुद्रात आढळणाºया प्लॅस्टिक कचºयाचा मुद्दा मांडण्यात आला. प्लॅस्टिक समुद्रात जाऊ नये, यासाठी कोणत्या उपाय योजना करणे आवश्यक आहे, यावर सरकारने विचार करायला हवा, असा तारांकित प्रश्न मंत्र्यांनी राज्यसभेत उपस्थित केला होता.

प्रदुषणाचाही बसतो आहे फटका
समुद्रात प्लॅस्टिक सोबत इतर प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी बोक्शी या प्रकारच्या मासेमारीमध्ये एक मैलावर जाळे टाकले जायचे. तेव्हा जाळ््यात मोठ्या प्रमाणात मासे मिळायचे. परंतु आता समुद्रात १०-१२ नॉटिकलपर्यंत आत गेल्यावर अशा प्रकारचे भरपूर मासे कधी-कधी मिळतात. - कृष्णा कोळी, मच्छीमार, मढ किनारा
 

Web Title: 49 kg of plastic in Mumbai sea, 20 kg in Ratnagiri, 2 kg in Visakhapatnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.