२९ टक्के कुटुंबीयांना ज्येष्ठ नागरिक वाटतात ओझे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:07 AM2019-06-15T03:07:31+5:302019-06-15T03:07:35+5:30

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिन - हेल्पेज इंडियाच्या अहवालातील निष्कर्ष; ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवून भेटायला जाण्याला अनेकांची पसंती

29% of the households feel the burden of senior citizens | २९ टक्के कुटुंबीयांना ज्येष्ठ नागरिक वाटतात ओझे

२९ टक्के कुटुंबीयांना ज्येष्ठ नागरिक वाटतात ओझे

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ नागरिक हा प्रत्येक कुटुंबाचा महत्त्वाचा भाग असतो. परंतु २९ टक्के कुटुंबीयांना ज्येष्ठ नागरिक हे ओझे वाटत असल्याचा निष्कर्ष हेल्पेज इंडियाच्या अहवालातून समोर आला आहे. १५ जून हा जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिन आहे. यानिमित्त हेल्पेज इंडियाने एक सर्वेक्षण केले होते. त्याच्या अहवालाचे आणि हेल्पेज इंडियाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘सेव अवर सिनिअर’ या अ‍ॅपचे अनावरण अभिनेत्री शमिता शेट्टीच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर म्हणाले की, हेल्पेज इंडियाकडून ज्येष्ठ नागरिकांबाबत सर्वेक्षण करण्यात येते. २० शहरांतील ३५ ते ५० च्या वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही पिढी वृद्ध आईवडील आणि आपल्या मुलांची देखभाल करते.

यातून असे समोर आले की ज्येष्ठांची देखभाल करणाऱ्यांपैकी २९ टक्के लोकांना ज्येष्ठांची देखभाल हे खूप मोठे ओझे वाटते. तर २५.७ टक्के देखभाल करणारे सांगतात की, आपल्या कामाचा किंवा इतर राग ते ज्येष्ठांवर काढतात. ३५ टक्के व्यक्तींना ज्येष्ठांची देखभाल करताना आनंद वाटत नाही. २९ टक्के व्यक्तींना ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांना भेटायला जाणे सर्वांत चांगले वाटते. ६८ टक्के सुना ज्येष्ठांची जबाबदारी आपल्या नोकरांवर सोपवितात. तसेच ७० टक्के ज्येष्ठांना देखभाल करणाऱ्यांकडून भावनिक आधाराची गरज असते, असेही अहवालात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांचा औषधांवर मोठा खर्च होतो. त्यांना मोफत औषधे सरकारने उपलब्ध करून द्यायला हवीत. तसेच जी मुले ज्येष्ठांचा चांगला सांभाळ करतात त्यांना करामध्ये सूट द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

अहवाल काय सांगतो?
29% लोकांना ज्येष्ठांची देखभाल हे खूप मोठे ओझे वाटते.


ज्येष्ठांना त्रास देणे अशोभनीय
मुलांनी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी ज्येष्ठांना त्रास देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. हे बदलण्याची गरज आहे
- शमिता शेट्टी, अभिनेत्री

डोक्यावर छप्पर असणे महत्त्वाचे
घर माझ्या नावावर असूनही सून आणि मुलाने खूप त्रास दिला. घराबाहेर काढले. परंतु हेल्पेज इंडियाच्या मदतीने मला एक वर्षात माझे घर पुन्हा मिळाले. डोक्यावर छप्पर असणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
- लीलाबाई माने, ज्येष्ठ नागरिक

कायदेशीर लढा देऊन घर परत मिळविले
पती आणि मुलाच्या निधनानंतर खचून गेले होते. घरात सुनेसोबत राहत असताना तिने खूप मानसिक त्रास दिला. जेवण दिले नाही. घराबाहेर काढले. परंतु कायदेशीर लढा लढून घर परत मिळविले. - वैशाली शिर्के, ज्येष्ठ नागरिक

Web Title: 29% of the households feel the burden of senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई